आम्ही आमची ‘ग्रेट’ राजधानी स्वच्छ करत आहोत. आणि आम्हाला राजधानीत गुन्हेगारी नको आहे. न्याय विभागाच्या (जस्टीस विभाग) अधिकाऱ्याना ट्रम्प यांनी असे सांगितले आहे. राजधानी वॉशिंग्टनला येणारे पंतप्रधान मोदी, इतर जागतिक नेते यांना वॉशिंग्टन मधील फेडरल इमारती पाशील तंबू , रस्त्यातील खड्डे , कसलाही मजकूर लिहिलेल्या, रंगवलेल्या भिंती दिसणे मला नको आहे असे सांगत प्रेसिडेंट ट्रम्प यांनी ‘स्वच्छ वॉशिंग्टन’ चा ऐलान केला. याच बरोबर राजधानीतील गुन्हेगारीही समाप्त करा असे त्यांनी सांगितले.
वॉशिंग्टन डी सी चे महापौर म्युरीयल बाऊजर या बाबतीत चांगले काम करत आहेत असे ही ते म्हणाले. परंतु त्याचवेळी स्थानिक नेत्याना व प्रशासनास ते जमत नसेल तर संघप्रशासन वॉशिंग्टन डीसी ‘टेक ओवर’ करेल अशी तंबीही त्यांनी दिली. ” प्रशासनाच्या विभागासमोरच तंबूंची गर्दीच झाली होती ते हाटवले पाहिजेत आणि त्यांनी ते ताबडतोब हलवले. सुरुवात तर चांगली झाली आहे. आपल्याला आपली राजधानी अशी पाहिजे की ती साऱ्या जगाच्या चर्चेचा विषय बनली पाहिजे. पंतप्रधान मोदी, फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष आणि इतरही जेव्हा मागील सप्ताहात आले होते त्यावेळी सर्व मार्ग आधीच तपासून घेतले होते. मला त्यांनी आपल्या राजधानीतील तंबू, रस्त्यातील खड्डे,रस्त्यावरची तुटकी बॅरीकेड्स हे पाहणे नको होते. आणि ही स्वच्छता आपण साऱ्या शहराची करत आहोत. जगातून इथे येणाऱ्या लोकाना कोणी लुबाडले, गोळीबार केला, लैंगिक छळ केला असे होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी नसलेले स्वच्छ, उत्तम आणि सुरक्षित शहर आपण त्यांना देणार आहोत आणि यासाठी काही फारसा वेळ लागणार नाही “. – प्रेसिडेंट ट्रम्प
ट्रम्प यांनी या आधीही वॉशिंग्टन जिल्हा संघप्रशासनाकडे (फेडरल प्रशासन) देणे बाबत सुतोवाच केले होते. जॉर्ज फ्लॉइड च्या खूना नंतर ‘ब्लॅक लाईवज् मॅटर’या आंदोलनात व्हाईट हाऊस कडे जाणारे रस्त्यावर ‘ग्राफिटी’ व ‘स्लोगन्स’ रंगवलेली दिसत होती तेव्हाही ट्रम्प यांनी त्यावर टीका केली होती. ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून इस्राइलचे पंतप्रधान नेतान्याहू, जपानचे पंतप्रधान ईशीबा , जॉर्डनचे राजे किंग अब्दुल्ला, फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन व ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर हे पहिल्या महिन्यातच त्यांना भेटले.