spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeआंतरराष्ट्रीयशुभांशू शुक्ला १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीवर परतले

शुभांशू शुक्ला १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीवर परतले

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे अंतराळयान ‘ग्रेस’ कॅप्सूल प्रशांत महासागरात उतरले. संपूर्ण देश त्यांची श्वास रोखून वाट पाहत होता. शुभांशू शुक्ला ते पृथ्वीवर परतताच देशभर आनंदाची लाट उसळली. त्यांच्या आईने सुटकेचा नि:श्वास सोडला. 

अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १८ दिवस घालवल्यानंतर शुभांशू आज पृथ्वीवर परतले. अंतराळातून परतल्यानंतर त्यांना थेट घरी पाठवले जाणार नाही तर प्रथम त्यांना नासाच्या वैद्यकीय आणि पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात येत आहे. अंतराळाच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वेळ घालवल्यानंतर शरीराचे स्नायू कमकुवत होतात. प्रवासी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात परत येताच त्यांना चक्कर येणे, थकवा आणि संतुलन बिघडणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या कारणास्तव नासा त्यांना थेट कुटुंबाशी भेटण्याऐवजी प्रथम फ्लाइट सर्जनच्या देखरेखीखाली ठेवते.

शुभांशू यांना पुनर्वसन केंद्रात पहिले ७ दिवस अतिशय काळजीपूर्वक आणि वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेल्या प्रक्रियेत घालवले जातील. या काळात त्यांच्या शारीरिक हालचालींवर विशेष लक्ष दिले जाईल. ज्यामध्ये स्नायू आणि हाडे पूर्ववत होण्यासाठी ठराविक प्रकारचा व्यायाम त्यांच्याकडून करून घेतला जाईल. यासोबतच शरीराची संतुलन प्रणाली तपासली जाईल जेणेकरून चक्कर येणे, डोकेदुखी आणि थकवा यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवता येईल. या सर्वांमध्ये वैज्ञानिक पथक त्याच्या मोहिमेशी संबंधित माहितीचे डेटा विश्लेषण करेल. यावरून  भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचे निष्कर्ष काढता येणार आहे.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments