spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeराजकीयस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत

महापालिका निवडणुकीसाठी दिवाळीनंतर सज्ज व्हा : अजित पवार

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, राजकीय पक्षांनीही तयारीला सुरुवात केली आहे.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात घेतलेल्या बैठकीत निवडणुकांसंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

अजित पवार – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या, तसेच नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातील. तर दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार असून त्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या अखेरीस, म्हणजेच दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.”
या वक्तव्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप अपेक्षित असली तरी, राजकीय तयारी सुरू करण्याचा स्पष्ट संकेत पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना, सर्व प्रभागांमध्ये तातडीने तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) महायुतीसोबत समन्वयाने निवडणूक लढवेल की स्वबळावर उतरेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांनी सुचवलेल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकांमुळे पक्षांचे नियोजन, प्रचार रणनिती आणि जागावाटपाच्या चर्चांना आता अधिकृत रूप मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

  • पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका
  • दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुकांची शक्यता
  • अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिली सर्व प्रभागांत तयारी सुरू करण्याची सूचना
  • महायुतीत मतभेद झाल्यास राष्ट्रवादीचे स्वतंत्र लढण्याचे संकेत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम जवळ येत असून, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचा आदेश देत रणशिंग फुंकले आहे. आगामी काही महिने राजकीय घडामोडींच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरणार आहेत.

—————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments