नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू जॅनिक सिनर याने इतिहास रचत आपल्या कारकिर्दीतील पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम सामन्यात गतविजेता कार्लोस अल्काराजवर ४-६, ६-४, ६-४, ६-४ असा दमदार विजय मिळवला. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या फ्रेंच ओपन फायनलमध्ये अल्काराजकडून झालेला पराभव विसरून, जॅनिकने त्याचा जोरदार बदला घेतला.
टप्प्याटप्प्याने यशाकडे वाटचाल
चोवीस वर्षीय इटालियन स्टार जॅनिक सिनरसाठी हा सामना केवळ विजेतेपदासाठी नव्हता, तर वैयक्तिक प्रतिष्ठेचा मुद्दाही होता. अल्काराज विरुद्धची ही लढत एक क्लासिक संघर्ष ठरली. पहिला सेट गमावल्यानंतर सिनरने संयम राखून उर्वरित तीन सेटमध्ये प्रभावी खेळ केला आणि प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी दिली नाही.
जॅनिक सिनरचे ग्रँड स्लॅम्समधील यश
-
ऑस्ट्रेलियन ओपन – विजेते (२ वेळा)
-
यूएस ओपन – २०२४ – विजेते
-
विम्बल्डन-२०२५ – विजेते (पहिल्यांदा)
या विजयामुळे जॅनिक सिनरचे ग्रँड स्लॅम विजेतेपदांची संख्या चारवर पोहोचली असून, तो आधुनिक टेनिसमधील सर्वात धडाडीचे नाव म्हणून ओळखला जात आहे.
सिनरने मिळवलेले हे विम्बल्डन जेतेपद इटलीसाठीही गौरवाचा क्षण ठरले आहे. तो या प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा पहिला इटालियन पुरुष खेळाडू ठरला आहे.
——————————————————————————————-