कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या तीव्र विरोधानंतर होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द करण्यात आली आहे. यामुळे येत्या १५ जुलैपासून सुरू होणारी आधुनिक औषधशास्त्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course in Modern Pharmacology CCMP) नोंदणी थांबवण्यात आली आहे.
सिसिएमपीसह होमिओपॅथी डॉक्टरांना एमबीबीएस डॉक्टरांसमान ॲलोपॅथी उपचार करण्यास परवानगी देणे हे “रुग्णांना पराभूत करणे” आहे, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. अशा अधिसूचना सार्वजनिक आरोग्यास धोका असल्याचे त्यांनी ठामपणे म्हटले. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्यास परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या जीवनाशी खेळणे असे निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) सूचित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता.
इंडियन मेडिकल असोसिएशन गेल्या अनेक दिवसापासून होमिओपॅथी डॉक्टरांची सुरु असलेली ॲलोपॅथी प्रॅक्टिस बंद करा अशी मागणी करत आहे. होमिओपॅथी डॉक्टरांनी ॲलोपॅथी प्रमाणे उपचार केल्यास याचा रुग्णांना धोका होऊ शकतो असाही इशारा आयएमएने दिला होता. कारण ॲलोपॅथी उपचार पद्धती आणि होमिओपॅथी उपचार पद्धती भिन्न आहेत. याचा विचार करून होमिओपॅथी डॉक्टरांची सुरु असलेली ॲलोपॅथी प्रॅक्टिस बंद करावी अशी मागणी आयएमएने केली होती.
———————————————————————————————–



