जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ३९३ परदेशी उपग्रह व्यावसायिक पद्धतीने भारताने अंतराळात लॉंच केले. या साठी ईस्त्रो चे पीएसएलव्ही , एलव्हीएम ३ व एसएसएलव्ही हे लॉंचपॅड म्हणून वापरण्यात आले. भारताने आजपर्यंत ३४ देशांचे उपग्रह लॉंच केले आहेत. यातील २३२ तर केवळ अमेरिकेचे आहेत. त्या व्यतिरिक्त ग्रेट ब्रिटन चे ८३, सिंगायपोर चे १९, कॅनडा चे ८, कोरियाचे ५, लूक्समबर्ग चे ४,इटली चे ४, जर्मनी चे ३ , बेल्जियम चे ३, फिनलंड चे ३, फ्रांस चे ३, स्वित्झर्लंड चे २, नेदेरलंडचे २, जपान च २, इस्राइल चे २, स्पेन चे २, ऑस्ट्रेलियाचे १, यू ए इ चा १ व ऑस्ट्रीया चा १ असे हे ३४ देश व 393 उपग्रह आहेत. अशी लेखी माहिती विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थ सायन्सेस, अणू ऊर्जा खाते, अंतराळ खाते यांचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
२०१५ ते २०२४ या काळात भारताने इतर देशांचे उपग्रह प्रक्षेपित करून तब्बल १४३ दशलक्ष परदेशी चलन कमावल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली.
भारताच्या अंतरिक्ष संशोधनातील अथक प्रगतीची ही यशस्वी कहाणी आहे. ही कामगिरी प्रत्यक्षात उतरवणारे संशोधक, वैज्ञानिक इस्रो चे आहेत. अल्पावधीत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व संशोधन विकसित करणारी इस्रो स्वतंत्र भारताच्या वैज्ञानिक प्रगतीतील सोनेरी पान आहे .
इस्रो -भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारताची राष्ट्रीय अंतरिक्ष संशोधन संस्था. अंतरिक्षाचे संशोधन करणे, पृथ्वीचे संशोधन करणे, उपग्रहामार्फत माहिती व संपर्क तंत्रज्ञान विकसित करणे. अंतरिक्ष संशोधनाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करणे, इतर अंतरराष्ट्रीय अंतरिक्ष संशोधन करणा-या संस्थासह संयुक्त उपक्रम राबवणे हे मुख्य हेतू. दूरदर्शन प्रक्षेपण, हवामानविषयक सेवा, राष्ट्रीय संसाधानांची माहिती व त्याचे व्यवस्थापन यासह इस्रोने उपग्रह प्रक्षेपण, जरूरी असलेल्या कक्षेत उपग्रह अचूक स्थिर करण, यामध्ये उत्कृष्ट यश मिळवल आहे. इस्रो चे मुख्यालय बेंगलोर येथे आहे.
भारताचा पहिला उपग्रह आर्यभट 1975 मधे-सोवियत रशियाच्या सहकार्याने. एसएलव्ही-3 1980- संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह प्रक्षेपित करण्याचे तंत्रज्ञान. रोहिणी उपग्रह प्रक्षेपित केला. ईन्सॅट-1983- पृथ्वीच्या कक्षेत स्थिर केलेला भारताचा पहिला उपग्रह. चांद्रयान 1-2008- भारताचे पहिले यशस्वी चंद्रावरचे मिशन .मंगलयान-2013 भारताचे पहिले यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारे यशस्वी मिशन, एसएसएलवी -२०२२ भारताचे पहिले उपग्रह पाठवू शकणारे लॉंच vehicle. याने ३ उपग्रह यशस्वीरित्या पाठवले. चंद्रयान ३ -२०२३ – चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. गगनयान -२०२३ – या कार्यक्रमांतर्गत ३ लोकांच्या क्रू सह ४०० किमी पृथ्वीच्या कक्षेत मानव पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे, २०२३ – ३६ oneweb उपग्रह अंतराळात पाठवले. व्यावसायिक उपग्रह अंतराळात पाठवण्यात महत्वाचा टप्पा गाठला. आदित्य L 1 – भारताचे पहिले सूर्य अभियान, शुक्र अभियान अशी अनेक मिशन्स भारतीय गौरवाची गाथा सांगत आहेत. अनेक वेळा इतर देशांनी भारताला अंतरिक्ष संशोधनाचे, उपग्रहाबाबतचे, प्रक्षेपणासाठीचे तंत्रज्ञान मिळू दिले नाही परंतु इस्रो चे संशोधक डगमगले नाहीत. अनेक वेळा जगाने असे ही पहिले की परदेशात होणाऱ्या, नासा सारख्या नामवंत संशोधन संस्थेत होणाऱ्या खर्चापेक्षा निम्या खर्चात भारतीय वैज्ञानिकानी ते काम करून दाखविले.
.ईस्त्रोची स्थापना ऑगस्ट 1969 रोजी विक्रम साराभाई यांनी केली.ईस्त्रो स्पेस रिसर्च विभाग (DoS) अंतर्गत कार्यरत आहे, ज्याचे नियंत्रण भारताचे पंतप्रधान करतात.इस्रो ने अंतराळ संशोधनात महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत आणि भारताच्या तांत्रिक प्रगतीमध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे.