बुलढाण्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळचे तरूण राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा जलाशयातून परिसरातील शेती साठी पाणी मिळावे म्हणून अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. परंतू पुढचे तीन महिने पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याने निराशेतून त्यांनी होळीच्या दिवशी मृत्यूस कवटाळले. चार पानी सुसाईड नोट लिहून शेतातच विषारी औषध घेऊन जीवन संपवले.
परिसरातील शेतक-यामधे ते लोकप्रिय होते. काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात भाजपा सरकारच जबाबदार आहे व हा सरकारी बळी आहे अशी गंभीर टीका केली आहे. कृषी मंत्री कोकाटे यांनीही या दुर्दैवी घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. अडचणीमुळे शेतकरी आत्महत्या करतात हे दुर्दैवी आहे. सरकार प्रयत्न सोडणार नाही असे मंत्री शिरसाट म्हणाले.
सहकारी बना व सहकारी बनवत चला असे घोषवाक्य त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचे बॅनरवर होते. स्वतःचा काळ्या मातीचा धनी असाही उल्लेख त्या बॅनरवर केला होता. त्यांच्या धक्कादायक आत्महत्येमुळे परिसरातील शेतकरी वर्ग हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.