दुर्ग भ्रमंतीत रमलेला साहित्यिक : गोनीदा

0
117
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क 

गोपाळ नीलकंठ दांडेकर (गो.नी. दांडेकर) अर्थात गोनीदा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. साहित्यिक, गड अभ्यासक, चित्रपट कथा लेखक, सामाजिक कार्यकर्ते या क्षेत्रात गोनीदा अखंडपणे कार्यरत होते. साधेपणा, अनुभववाद, प्रादेशिक बोली आणि साध्वी दृष्टिकोनातून त्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. गो. नी. दांडेकर यांचीच “जैत रे जैत” कादंबरीचित्र १९६५ मध्ये प्रसिद्ध झाली. तिचाच आधार घेऊन १९७७ मध्ये दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी “जैत रे जैत” चित्रपट बनवला. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाली आहे. आज ८ जुलै गोनीदा याचा जन्मदिवस. यानिमित्त त्यांच्याविषयी….

गोनीदा यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२-१३व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी घर सोडले. शाळा सोडून संत गाडगेबाबांच्या सोबतीने गोनीदांनी महाराष्ट्रात भ्रमण केले. नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले.

कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक अशा अनेक साहित्य प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले. गोनीदांचं लिखाण अस्सल आहे. समाजात घडणार्‍या घडामोडींवरची प्रतिक्रिया नाही, तो अनुभवसंपन्न आयुष्याचा मांडलेला लेखाजोखा आहे. त्यांची वेदनाही अस्सल आणि आणि विचारही नवा आहे. त्यांची पुस्तकं वाचणं म्हणजे केवळ मनोरंजनासाठी पानं उलटणं नव्हे, तर प्रयत्नपूर्वक समजून घेण्याचा विषय असतो. जन्मजात मिळालेल्या प्रतिभेमुळे हाती घेतील, तो विषय उत्कृष्टपणे मांडण्याची सिद्धहस्त कला त्यांच्याकडे होती.

विदर्भातला जन्म असूनही गोनीदांना ओढ लागली, ती कोकणाची! एखाद्या भागाचे देशाचे वर्णन करताना ते त्याची ओळख पहिले निसर्गसौंदर्याने करतात. त्या भूभागाशी आपण समरस होतो न होतो, त्याचवेळी ते इतर भौगोलिक परिस्थितीची माहिती देतात, बागा, तळी, नदी, शेतं, यातून तिथला माणूस किती समृद्ध आहे, याची आपल्याला कल्पना येते. पुढे सुरू होते, तिथल्या माणसांची ओळख. त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे गुण-दोष, स्थानिकांच्या अडचणी, आणि मग त्यांची मानसिकता. यातून आपण त्या पात्राशी स्वतःला जोडून घेतो. मग पुस्तकांचा आणि आपला प्रवास एकत्र सुरू राहतो. कोकणाचं वर्णन करणारी त्यांची अनेक  पुस्तके आहेत, त्यातच ’शितू’ आणि ’पडघवली’ ही दोन कायम लक्षात राहण्यासारखी.

गो. नी. दांडेकर हे मराठी साहित्यविश्वातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कादंबऱ्यांइतकेच त्यांचे चित्रपट लेखनसुद्धा लक्षणीय आहे. त्यांनी काही चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले होते. त्यांचे लेखन, जीवन आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या वास्तवाचे सूक्ष्म निरीक्षण यामुळे त्यांनी चित्रपट माध्यमालाही दर्जेदार साहित्य दिले. पुढचं पाऊल, भूमिका, तुझे बंधन घालू का, कथा गोविंदाची, धारावाहिक – चंद्रमुखी या चित्रपटांची निर्मिती झाली. त्यांच्या काही कथांवर आधारित दूरदर्शनवरील मालिका ही निघाल्या. त्यांनी पटकथा किंवा कथानकासाठी मौलिक साहित्य दिले होते. गो. नी. दांडेकर यांचीच “जैत रे जैत” कादंबरी १९६५ मध्ये प्रसिद्ध झाली. तिचाच आधार घेऊन १९७७ मध्ये दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी चित्रपट बनवला.

पुरस्कार व सन्मान : साहित्य अकादमी पुरस्कार – त्यांच्या “पवनदूत” कादंबरीसाठी. पद्मश्री पुरस्कार – भारतीय साहित्य व संस्कृतीसाठी दिलेले योगदान. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९८०)

गो. नी. दांडेकर यांचे कार्य म्हणजे मराठी मातीतील जीवनाचे, श्रद्धेचे, इतिहासाचे आणि अध्यात्माचे प्रतिबिंब आहे. त्यांनी शब्दांमधून लोकमानसाचे दर्शन घडवले. त्यांच्या साहित्यामुळे मराठी वाचकांना आपले मूळ, आपली संस्कृती आणि आपली माणसे अधिक जवळून समजली.

—————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here