मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील विविध सरकारी विभागांमधील रिक्त पदांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘मेगा भरती’ जाहीर करण्यात येणार असून, सर्व विभागांना १५० दिवसांच्या आत उद्दिष्टपूर्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रत्येक विभागातील अचूक रिक्त पदांची माहिती उपलब्ध होईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ७५ हजार पदांच्या भरती कार्यक्रमाअंतर्गत एक लाखांहून अधिक पदांवर भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे शासनाच्या विविध विभागातील कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत झाली आहे.
अनुसूचित जमातींसाठी विशेष भरती
अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील ६,८६० पदांवर कार्यरत असलेले कर्मचारी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकल्यामुळे ही पदे ‘अधिसंख्य’ म्हणून गणली जात आहेत. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांना पदावरून हटवण्यात येणार नाही. मात्र, त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, रिक्त झालेल्या १३४३ पदांवर भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली.
राज्यातील युवकांसाठी ही भरती मोठा दिलासा ठरणार आहे. विशेषत: अनुसूचित जमातींसाठी सुरू असलेल्या भरतीमुळे या घटकाला नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पुढील काही महिन्यांत रिक्त पदांची अचूक माहिती समोर आल्यानंतर मेगा भरती प्रक्रियेला वेग मिळणार आहे.
हे ही वाचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील आद्य पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळ येथील मंदिराचे महात्म्य पहा..खालील लिंकवर….






