अवनिचा “परीस” प्रकल्प

0
89
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

कोल्हापूर जिल्ह्यांतील कचरा वेचक महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवत असताना त्यांच्या सहभागातून घरगुती व सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्या पासून खत तयार करण्याचा प्रकल्प अन्न वस्त्र निवारा (अवनि) संस्थेने कोल्हापुरातील संभाजी नगर, निर्माण चौक येथे सुरु केला आहे. या प्रकल्पात दररोज ५०० ते ७०० किलो कचऱ्याचे खत तयार केले जाते. येथे एक किलोपासून ते तीस किलोपर्यंत खत विक्री केली जाते. याचबरोबर अवनि कचऱ्याचे वर्गीकरण प्रशिक्षण व ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रशिक्षण देते.

कचरावेचक महिलांनी गोळा केलेल्या निरुपयोगी प्लास्टिकचे गट्टे करुन त्यांचा रस्ते डांबरीकरणाच्या कामात उपयोग करण्यात येतो. निगवे येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातुन १५०० कुटुंबाचे कचरा संकलन व निर्गतीकरण उपक्रम सुरु आहे. कोल्हापूर शहरातील राजेंद्र नगर, जरगनगर, रुईकर कॉलनी, देवकर पाणंद, नागाळा पार्क, क्रांती नाना पाटील नगर येथील पर्यावरणवादी लोकांच्या माध्यमातून सुका कचरा संकलन करुन ड्रायवेस्ट झोन निर्मिती करण्यात आले आहे. कळंबा, वडणगे, पाचगांव, नंदवाळ, वाशी, जैताळ या गावामध्ये कचरा वर्गीकरण जनजागृती उपक्रम सुरु आहे. दरवर्षी गौरी-गणपती विसर्जन उत्सवामध्ये निर्माल्य वर्गीकरण उपक्रम गेल्या दहा वर्षापासून सात्यत्यपुर्वक सुरु आहे. आषाढी एकादशी, निमित्त प्रतिपंढरपुर नंदवाळ येथे दरवर्षी जनजागृती व निर्माल्य वर्गीकरण उपक्रम राबविते.नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर येथे संकलित केलेले निर्माल्य निर्माण चौक येथील संकलन केंद्रावर खत निर्मिती करण्यात येते. जरगनगर प्रभागात सॅनिटरी पॅड, हगीज, डायपर यांचे योग्य नियोजन करणेबाबत जनजागृती केली जाते.

यावर्षी अवनि सोबत वारणा दूध संघ व प्रसारमाध्यम संस्था नंदवाळ येथे आषाढी एकादशी दिवशी  ‘वारी स्वच्छतेची वारी आरोग्याची’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरावेचक महिलांना कचरा वर्गीकरण कामात सहभागी करून घेणे, त्यांना ओळखपत्र देणे, त्यांची बचत गट तयार करणे, त्यांना हातमोजे पुरवणे इत्यादी कामासाठी संस्था कार्यरत आहे.  संस्थेने कचरा वेचक महिलांचे संघटन केले आहे, तसेच वस्तीपातळीवर अॅक्टीव्ह केडर नेमून कचरावेचक महिलांच्या अधिकारांची जाणीव निर्माण करुन देणे, या सर्व बाबी लक्षात घेऊन संस्था गेली १५ वर्षे कचरा वेचक महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देणेसाठी कार्यरत आहे.

—————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here