कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance – DA) वाढ मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही वाढ ८ वा वेतन आयोग लागू होण्याच्या आधीच होऊ शकते. दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकाच्या आधारे डीएमध्ये फेरबदल केला जातो. यंदाच्या सुरुवातीपासूनच महागाई निर्देशांकात सातत्याने वाढ झाल्याने, जुलैपासून डीएमध्ये ३ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के डीए दिला जात आहे आणि ही वाढ झाल्यास तो ५३-५४ टक्के पर्यंत जाऊ शकतो.
८ वा वेतन आयोग लवकरच
याशिवाय ८ व्या वेतन आयोगाबाबत चर्चांना देखील जोर आला आहे. अनेक कर्मचारी संघटनांनी याबाबत मागणी केली असून, सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र डीए वाढीमुळे कर्मचारी वर्गामध्ये समाधानाची लाट पसरली आहे.
या वाढीचा थेट फायदा केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्त (पेन्शनधारक) व्यक्तींना होणार आहे. डीए मध्ये वाढ झाल्यास त्यांचे मासिक वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होईल, ज्याचा उपयोग महागाईचा तडाखा थोपवण्यासाठी होईल. ताज्या महागाई निर्देशांक आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ मिळू शकते. यामुळे सध्या ५५ टक्के असलेला डीए वाढून ५९ टक्केवर पोहोचेल.
दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकाच्या आधारे केंद्र सरकार डीए मध्ये बदल करत असते. जुलै २०२५ साठी मिळालेल्या आकडेवारीवरून ही वाढ अपेक्षित असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असून, यामुळे त्यांच्या एकूण पगारात थेट वाढ होणार आहे. याचा लाभ सुमारे ४८ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.
——————————————————————————————-



