पाकिस्तान मधील क्वेट्टा ते पेशावर जाणारी जाफर एक्सप्रेस रेल्वे काल बलूच लिबेरेशन आर्मी च्या दहशतवाद्यांनी ‘हायजॅक’ केली होती. बलूचिस्तान मधील बोलान जिल्ह्यातील दुर्गम डोंगररांगात रेल्वेच्या बोगद्या अलीकडेच रेल्वे रुळावर स्फोटके लावून उडवल्याने व संपूर्ण रेल्वे ताब्यात घेतल्याने पाकिस्तान लष्करास ओलिस प्रवाशांच्या सुटकेसाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत .
गाडीत एकूण ४५० प्रवासी होते व त्यात मुले व स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. आत्ता पर्यंतच्या वृत्तानुसार १५५ प्रवासी मुक्त करण्यात पाकिस्तानी लष्करास यश मिळाले असून या कारवाईत ३० पाकिस्तानी सैनिक व २७ बलूच दहशतवादी ठार झाले आहेत. बलूच लिबेरेशन आर्मीने बारकाइने आखलेल्या व पार पाडलेल्या ‘ऑपरेशन मध्ये जाफर एक्सप्रेस रेल्वे रूळ उडवून अडवली असून सर्व प्रवाशांन ओलिस म्हणून ठेवण्यात स्वतंत्र बलूचीस्तान साठी लढणारे आमचे लडाकू यशस्वी झाले आहेत असे बलूच लिबरेशन आर्मी ने जाहीर केले आहे.
बलूच लिबेरेशन आर्मी च्या ‘माजीद ब्रिगेड’ने हा हल्ला केला होता. या पूर्वी याच मजीद ब्रिगेडने चीन पाकिस्तान एकॉनॉमिक कॉरिडॉर बलूचीस्तान मधून जात असल्याने तेथे आलेल्या चीनी कर्मचाऱ्यांवर हल्ले चढवले होते. पाकिस्तानी सुरक्षा दल या ‘अवघड’ कार्यवाहित गुंतले आहे.बलूच लिबेरेशन आर्मीने ओलिस ठेवलेल्या प्रवास्यानच्या सुटकेसाठी लष्करी कारवाई केल्यास प्रवासींना ठार करू असे सांगितले होते. या पूर्वी ही .बलूच लिबेरेशन आर्मीने पाक सुरक्षा जवान व अधिकारी , शासकीय कार्यालये व इमारती, चीनी कर्मचारी राहत असलेली हॉटेल्स यावर हल्ले केलेले आहेत