spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeशासकीय योजनाआजपासून देशभरात क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर ते पॅनकार्ड बाबत नवे नियम

आजपासून देशभरात क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर ते पॅनकार्ड बाबत नवे नियम

या बदलांचा दैनंदिन जीवनावर होणार परिणाम

 नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

आजपासून म्हणजेच १ जुलै २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार असून, क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, एलपीजी, यूपीआय, रेल्वे तिकीट आरक्षण, जीएसटी रिटर्न आणि जेट इंधनाच्या दरांमध्ये मोठे बदल झाले आहेत. जाणून घेऊया कोणते नियम बदललेत.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसाठी BBPS अनिवार्य

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लागू केलेल्या नव्या नियमांनुसार, आता क्रेडिट कार्डचे बिल भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) च्या माध्यमातूनच भरावे लागेल. यामुळे क्रेड, फोनपे, बिलडेस्कसारख्या इतर प्लॅटफॉर्मवर परिणाम होणार असून, ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार करता येतील.

नवीन पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) ने मोठा निर्णय घेतला आहे. आता नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असेल. याआधी जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या कागदपत्रांवरही पॅन मिळत असे. पण आता आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतरच पॅन कार्ड जारी होईल.

व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त

आजपासून इंडियन ऑइलने कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे.

  • दिल्ली : ₹ ५८.५ स्वस्त   

  • कोलकाता : ₹५७ स्वस्त

  • मुंबई : ₹५८ स्वस्त

  • चेन्नई : ₹५७.५ स्वस्त

  • सलग चौथ्या महिन्यात कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत घट झाल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे.

यूपीआय चार्जबॅक प्रक्रिया सोपी

यूपीआय व्यवहारात चार्जबॅक म्हणजेच चुकीच्या व्यवहारांची रक्कम परत मिळवण्यासाठी नव्या नियमांची घोषणा झाली आहे. याअंतर्गत बँकांना एनपीसीआयची परवानगी न घेता थेट चार्जबॅक क्लेम पुन्हा प्रोसेस करता येणार आहे. यामुळे ग्राहकांना तक्रारी जलद मार्गी लागणार आहेत.

रेल्वे आरक्षण चार्ट आठ तास आधी तयार

रेल्वेने आरक्षण चार्ट तयार करण्याच्या वेळेत मोठा बदल केला आहे. आता ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जाणार आहे. यामुळे वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना आधीच कळणार आहे की त्यांचे तिकीट कन्फर्म झाले की नाही.

जीएसटी रिटर्नसाठी कठोर नियम

जीएसटीएनने स्पष्ट केले आहे की, आता जीएसटीआर-3बी फॉर्म एडिट करता येणार नाही. यासोबतच तीन वर्षांनंतर मागील तारखेचा जीएसटी रिटर्न भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि व्यवसायिकांनी वेळेत आणि अचूक रिटर्न भरण्यावर भर द्यावा लागणार आहे.

जेट इंधनाच्या किमतीत वाढ

घरगुती विमानसेवांसाठी लागणाऱ्या जेट इंधनाच्या किमतीत सुमारे ७.५ टक्के वाढ झाली आहे.

  • दिल्ली : ₹ ६,२७१ वाढून ₹ ८,३४४.०५  प्रति किलोलीटर

  • कोलकाता: ₹ ९,५२६.०९ प्रति किलोलीटर

  • मुंबई: ₹ ५,९४६.५ प्रति किलोलीटर

  • चेन्नई: ₹ ६,६०२.४९  प्रति किलोलीटर

या वाढीमुळे विमान प्रवासाचे दर देखील महाग होण्याची शक्यता आहे.

१ जुलै पासून लागू झालेल्या या नव्या नियमांचा थेट परिणाम तुमच्या पैशांच्या व्यवहारांपासून ते प्रवासापर्यंत सर्व क्षेत्रांवर जाणवणार आहे. त्यामुळे बदललेल्या नियमांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा अनावधानाने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

————————————————————————————————–

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments