कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
इंग्लंडमध्ये “आपत्कालीन क्रमांक” म्हणजेच 999 (नाईन नाईन नाईन) हा क्रमांक ३० जून १९३७ रोजी अधिकृतपणे सुरु करण्यात आला. हा क्रमांक जगातील पहिला आपत्कालीन टेलिफोन क्रमांक होता, आणि याची सुरुवात लंडनमध्ये झाली. यामागचं मुख्य कारण म्हणजे १९३५ मध्ये लंडनमध्ये घडलेली एक दुर्दैवी घटना होती. एका घरात आग लागली आणि नागरिकांनी टेलिफोन एक्सचेंजवर फोन करून माहिती दिली, पण कॉल वेळेवर पुढे पोहोचला नाही. त्यातून शिकल्यानंतर हा विशेष क्रमांक सुरु करण्यात आला.
प्रेरणा कशी मिळाली?
१९३५ साली लंडनमधील एका घरात आग लागली होती. एका महिलेनं पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा कॉल स्वीकारण्यात उशीर झाला आणि त्यामुळे घरातील काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर समाजात मोठा संताप निर्माण झाला. त्यामुळे ब्रिटन सरकारनं British Post Office (त्यावेळचं टेलिफोन व्यवस्थापन करणारे) यांना एक तात्काळ संपर्कासाठी विशेष नंबर तयार करण्यास सांगितले. ब्रिटनमधील 999 सेवा अजूनही अस्तित्वात आहे. हा नंबर अजूनही सर्वात जुना आणि सतत कार्यरत असलेला आपत्कालीन क्रमांक मानला जातो.
हाच नंबर निवडण्यामागचं कारण:
999 हा नंबर रात्रीच्या अंधारातही डायल करता येईल असा सोपा नंबर होता. त्या काळात रोटरी डायल टेलीफोन वापरले जायचे. त्यावर ‘9’ ही संख्या सर्वात जास्त वेळ घेणारी होती, त्यामुळे अपघाताने नंबर डायल होण्याची शक्यता कमी होती. सुरुवातीला पोलीस, फायर ब्रिगेड, ऍम्ब्युलन्स या सेवांसाठी आपत्कालीन नंबरची सेवा उपलब्ध होती. हळूहळू इतर सेवा जसे की कोस्ट गार्ड, गॅस लीक, वीज तुटणे याही जोडल्या गेल्या.
इतर देशांनीही ही संकल्पना अंगीकारली:
अमेरिकेत – ९११ (१९६८ पासून) सुरु झाला. युरोपियन युनियनमध्ये – ११२ हा आपत्कालीन नंबर सुरु करण्यात आला. भारतामध्ये पहिला आपत्कालीन (Emergency) क्रमांक २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आला. हा “राष्ट्रीय आणीबाणी”चा हा काल (National Emergency) होता, आणि तो तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केला होता.
भारतात 112 – एकात्मिक आपत्कालीन सेवा नंबर
(हे पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि महिला सुरक्षा या सर्व सेवा एकत्रितपणे कॉल करण्यासाठी एकच क्रमांक आहे.)
इतर विशिष्ट आपत्कालीन क्रमांक:
-
👮 पोलिस: 100
-
🚒 अग्निशमन सेवा: 101
-
🚑 रुग्णवाहिका: 102
-
👩 महिला हेल्पलाइन: 1091
-
👶 बालहक्क संरक्षण (चाईल्ड हेल्पलाइन): 1098
-
🚨 रेल्वे आपत्कालीन सेवा: 139 (किंवा 182 – RPF हेल्पलाइन)
112 इंडिया मोबाइल अॅप सुद्धा उपलब्ध आहे, ज्याद्वारे एकाच क्लिकमध्ये आपत्कालीन सेवा संपर्क करू शकतो.



