राधानगरी : प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील फराळे येथे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्या मंदिर फराळे शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आरोग्यकीट,अंडी, बिस्किटे व वह्या-पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कै. सुनंदाबाई डवर फाउंडेशन डवरवाडीच्या वतीने विलास डवर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व अंडी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. नामदार गटाचे लक्ष्मण गिरी, सुरेश पाटील, तुकाराम सावंत, आनंदा पाटील यांच्या हस्ते आरोग्यकीट व खाऊ वाटप केले.
या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्यदृष्ट्या प्रोत्साहन मिळाले असून, गावात समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन शिक्षण व आरोग्यवर्धनासाठी दिलेला पाठिंबा लक्षवेधी ठरला. काळम्मावाडी येथे पशुपालक शेतकरी नितीन ज्ञानू माने यांच्या गोट्यामध्ये अज्ञात रोगामुळे एका म्हशीचा मृत्यू झाला तर इतर जनावरे आजारी पडली होती. यामध्ये त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं याबाबतची माहिती नामदार गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्या नंतर त्यांनी तालुक्यातून मदत गोळा करत त्यांना २५ हजारांची मदत दिली.



