spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeइतिहासभारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ

भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे करिष्मायुक्त, धाडसी, विनोदी, पण अत्यंत व्यावसायिक आणि प्रभावी व्यक्तिमत्व होते. ते केवळ एक सैनिक नव्हते, तर एक आदर्श नेता आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व होते, ज्यांचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे. भारत–पाकिस्तानचे १९७१ साली युद्ध -झाले.  यावेळी सॅम माणेकशॉ मुख्य सेनाप्रमुख होते. माणेकशॉ यांनी विचारपूर्वक युद्धाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे धैर्य, शौर्य आणि रणनीतीने १३ दिवसांत पाकिस्तानचा पराभव केला आणि पाकचा हा पराभवच बांग्लादेश निर्मितीस कारणीभूत ठरला. आज – २७ जून सॅम माणेकशॉ यांचा स्मृतिदिन यानिमित्त त्यांच्या कार्याची आठवण…

सॅम माणेकशॉ यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ रोजी अमृतसर मध्ये जन्म. त्यांना डॉक्रटर बनायचं होते पण ते सेनापती झाले. त्यांनी १९३२ मध्ये देहरादूनमधील इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. लष्कराचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते १९३४ मध्ये ब्रिटीश इंडियन आर्मीमध्ये सामील झाले. त्यांची लेफ्टनंट पदावर नियुक्त झाली. दुसऱ्या महायुद्धात १९४२ मध्ये बर्मामध्ये लढाईदरम्यान ते जखमी झाले. या युद्धातील पराक्रमाबद्दल त्यांना ‘मिलिटरी क्रॉस’ पदक मिळाले. १९६२ मधील चीन-भारत युद्धात, १९६५ मधील दुसऱ्या भारत–पाक युद्धातही त्यांनी शौर्य गाजविले. भारत–पाकिस्तानचे १९७१ साली युद्ध -झाले.  यावेळी सॅम माणेकशॉ मुख्य सेनाप्रमुख होते. माणेकशॉ यांनी विचारपूर्वक युद्धाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे धैर्य, शौर्य आणि रणनीतीने १३ दिवसांत पाकिस्तानचा पराभव केला आणि पाकचा हा पराभवच बांग्लादेश निर्मितीस कारणीभूत ठरला.

 भारतीय सेनाप्रमुख म्हणून त्यांनी १९६९ साली पदभार स्वीकारला. १९७१ मधील भारत–पाकिस्तान युध्दात त्यांचे धोरणात्मक व कुशल नेतृत्व फलदायी ठरले. त्यांनी युद्धापूर्वी योग्य तयारी व तांत्रिक विचार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना स्पष्ट सांगितला.  या युद्धात भारताने विजय मिळवला. १६ डिसेंबर १९७१ रोजी ९३ हजारपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले.

त्यांना भारत सरकारकडून १९६८ साली पद्म भुषण आणि १९७२ साली पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याना आदराने सैम बहादुर असे संबोधले जात होते.

सॅम माणेकशॉ यांचे वैशिष्ट्ये

धैर्यवान आणि निर्भय नेता :  सॅम माणेकशॉ यांनी युद्धाच्या कठीण प्रसंगातसुद्धा धैर्य आणि शांत डोकं ठेवून निर्णय घेतले. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांनी जबरदस्त नेतृत्व दाखवले आणि बांगलादेशाच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलला.

थेट आणि स्पष्टवक्ते : ते कधीही हातचं राखून बोलणारे नव्हते. जे वाटतं ते स्पष्टपणे, विनोदाच्या छटेत, पण नेमकं बोलायचे. त्यामुळेच त्यांचं भाषण नेहमी प्रभावी आणि प्रेरणादायक ठरायचं.

विनोदी स्वभाव : त्यांचा विनोदबुद्धीचा सेन्स अतिशय तीव्र होता. ते गंभीर प्रसंगांनाही हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न करत आणि त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हायचं.

प्रभावी नेतृत्व : त्यांनी त्यांच्या अधिकार्‍यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. ते “A good soldier fights not because he hates what is in front of him, but because he loves what is behind him” या तत्त्वावर विश्वास ठेवत.

शिस्तप्रिय पण सहृदय : त्यांनी लष्करात शिस्तीचा आग्रह धरला, पण तो मानवतेला मागे ठेवून नव्हे. ते त्यांच्या जवानांना नेहमी प्रोत्साहन देत आणि त्यांच्या कल्याणाची काळजी घेत.

देशभक्त : त्यांचं जीवन संपूर्णपणे देशसेवेसाठी समर्पित होतं. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी धोका पत्करून निर्णय घेतले.

१९७१ मध्ये भारत‑पाक युद्धात भारताच्या निर्णायक विजयात सॅम माणेकशॉ यांची  भूमिका विशेष होती. त्यांच्या कार्यासाठी त्यांना इतिहासातील सर्वोच्च लष्करी मानद पद — फील्ड मार्शल १ जानेवारी १९७३ रोजी देण्यात आले. त्यांची सेवानिवृत्ती १५ जानेवारी १९७३ रोजी झाली. फील्ड मार्शल पद भारताच्या लष्करामध्ये सर्वांत उच्च  मानद पद आहे . ते सेवानिवृत्तीनंतर कूनूरमध्ये साधे जीवन व्यतीत केले .

सॅम माणेकशॉ हे शौर्य, साहस, रणनीतिकदृष्ट्या उदंड आणि समुद्राप्रमाणे माणुसकीने समृद्ध व्यक्तिमत्वाचे प्रतीक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने मोठे विजय संपादन केले. सॅम माणेकशॉ (फील्ड मार्शल, “सॅम बहादूर”) यांचा मृत्यू २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन (तामिळनाडू) येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये झाला,

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments