spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeसामाजिकशाहू महाराजांना जयंती : जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

शाहू महाराजांना जयंती : जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जेष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित आणि दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. शिक्षण सर्वांसाठी खुले केले, आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि जातीभेद निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली. त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्या समाजाला दिशा देत आहे.

या प्रसंगी, महाराजांच्या दूरदृष्टीला आणि कार्याला नमन करून, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया असा संकल्प सर्वांनी केला. शाहू महाराज जन्मस्थळी विविध मान्यवरांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

————————————————————————————–

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments