राधानगरी : प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा धनगरवाडा ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी 25 जून रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याबाबतच्या तक्रारीनंतर तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारी, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने, माजी अर्थ आणि शिक्षण सभापती गोकुळचे संचालक अभिजीत तायशेट्ये, सुधाकर साळोखे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी धनगरवाडा ग्रामस्थांची समस्या जाणून घेत गावातील दोन्ही गटांना एकत्रित करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिले.
पाटपन्हाळा धनगरवाडा रस्ता प्रश्नासाठी गेली महिनाभर गावातील दोन गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत दोन्ही गटांना एकत्रित करून मामलेदार ॲक्टखाली रस्ता मागणी अर्ज केल्यानंतर रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धनगरवाडा ग्रामस्थांनी २५ जून रोजी होणारे आंदोलन स्थगित केले आहे.
यावेळी सरपंच संपदा पाटील माजी सरपंच बाबुराव बोडके, संदीप बोडके, बजरंग बोडके, दादू गावडे, भागोजी बाजारी,दुहू बोडके, प्रकाश लांबोरे आदी उपस्थित होते.






