जिल्हा प्रशासनामार्फत ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
114
Google search engine

कोल्हापूर: प्रसारमध्यम न्यूज

योग ही केवळ एक दिनचर्या नसून आरोग्यदायी जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. सर्व नागरिकांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, माय भारत, केंद्रीय संचार ब्युरो (महाराष्ट्र-गोवा) आणि पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा येथे साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा प्रोटोकॉल आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी योग प्रात्यक्षिके सादर केली.

या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) समाधन शेंडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तहसीलदार विजय पवार, सैफन नदाफ, सुनिता नेर्लिकर, माय भारतच्या जिल्हा समन्वयक पूजा सैनी, तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, मनिषा पाटील, क्रीडा कार्यकारी अधिकारी सोनल सावंत, क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, राज्य क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील, अनिकेत बोडके, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी अजिंक्य चौगले आदी मान्यवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 राज्य क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर यांनी योग प्रोटोकॉलचे संचालन केले. यावेळी आर्या पाटील हिने रिदमिक योगाची आणि दिव्यांशी पाटील, मृण्मयी करंदीकर, सोहम गाडगीळ, श्रेया कुंभार, श्रद्धा कुंभार, आर्वी पारकर, शौर्य कासार यांनी ग्रुप योग प्रात्यक्षिके सादर केली.

यशवंत भाऊराव पाटील हायस्कूल (कसबा बावडा), हॉली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल, एस्तर पॅटर्न स्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल, दत्ता बाळ हायस्कूल या शाळांतील एकूण ४५० विद्यार्थ्यांनी योग प्रोटोकॉलमध्ये सहभाग नोंदवला.

—————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here