मेन‌ राजाराम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला योगासनाचा अनुभव ..

0
253
Students of Main Rajaram School experienced yoga asanas
Google search engine


कोल्हापूर : प्रतिनिधी 

‘एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग’ या ब्रीदवाक्याने साजरा होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मेन राजाराम  प्रशालेतील ऐतिहासिक सभागृहामध्ये प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभात उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रात्यक्षिकातून योगासनाचा अनुभव घेतला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ शिक्षक अजय किल्लेदार व योगशिक्षिका शिवानी पाटगांवकर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली योगसाधना समारंभ उत्साहात संपन्न झाला.

योगासनांमुळे केवळ शरीराचं नाही, तर मनाचंही स्वास्थ्य सुधारतं. त्याचं महत्त्व भारतामुळे सगळ्या जगाला समजलं आहे. अभ्यास करताना येणारा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली व प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वृद्धिगंत होण्यासाठी, मनाची एकाग्रता वाढविण्यासाठीची योगासने केली पाहिजे , असे योगशिक्षिका शिवानी पाटगांवकर यांनी प्रात्यक्षिक कृतीतून सांगितले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ शिक्षक अजय किल्लेदार यांनी विद्यार्थ्यांना रोज सकाळी करता येईल अशा प्राणायाम व विविध सोपी योगासने सांगितली.

आज संपूर्ण समाज एका प्रकारच्या तणावातून जात आहे. अनेक क्षेत्रांमध्ये अशांतता आणि अस्थिरता वाढत आहे. अशा परिस्थितीत, योग आपल्याला शांतीची दिशा देतो. सध्याची जीवनशैली व त्याचे परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सहित सर्वांनी योग साधना नियमित करणे गरजेचे असल्याचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी सांगितले. प्रास्ताविक व स्वागत प्रा. बी.पी.माळवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. सुषमा पाटील यांनी केले.या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. गजानन खाडे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक वेदांत कुंभार यांच्या सहित प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व १२ वीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here