देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करणार : मंत्री शहा

0
76
Union Minister for Cooperation Amit Shah
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

‘सहकार से समृद्धी’ या मंत्राला मूर्त स्वरूप देत ग्रामीण भारतात परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) स्थापन करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी ही माहिती राष्ट्रीय सहकार परिषदेत दिली.

अमित शहा म्हणाले की, प्रत्येक गावात सहकारी संस्थांची माहिती संकलित करून डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेत पारदर्शकता व गतिशीलता वाढविण्याचा उद्देश आहे. पॅक्स संस्थांना केवळ कृषीपुरत्या मर्यादित न ठेवता, त्यांना २२ नव्या सेवाक्षेत्रांशी जोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक व्यापक व उपयुक्त सेवा मिळणार आहेत.

२२ नव्या सेवाक्षेत्रांमध्ये पुढील सेवांचा समावेश आहे:
  • जनऔषधी केंद्रे – स्वस्त दरात औषधे उपलब्ध
  • गॅस वितरण केंद्रे – घरगुती गॅसचा पुरवठा
  • पेट्रोल पंप – इंधनाची उपलब्धता
  • रेल्वे तिकीट सेवा – ग्रामीण भागातूनच आरक्षण
  • टॅक्सी सेवा – स्थानिक व प्रवासी वाहतुकीसाठी सुविधा
  • डेअरी व दुग्ध व्यवसाय सेवा

  • कृषी यंत्रसामग्री भाडे सेवा

  • शेतीविषयक प्रशिक्षण केंद्रे

  • ई-कॉमर्स वितरण केंद्रे

कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषि मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशीष शेलार आदी उपस्थित होते.

या सर्व सेवांच्या एकत्रिकरणामुळे पॅक्स संस्थांचे बहुउद्देशीय रूपांतर होणार असून, गावपातळीवर रोजगार निर्मिती, आर्थिक स्वावलंबन व विकासाची गती वाढणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here