जगभरातील हजारो शाळांमधून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकमेव मराठी माध्यम शाळा आहे.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
ब्रिटनमध्ये आयोजित केलेल्या जगातील सर्वोत्तम शाळा वार्षिक स्पर्धेत चार भारतीय शाळांना पहिल्या १० मध्ये स्थान मिळाले. यात महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील शाळांचा समावेश आहे. विविध श्रेणींमध्ये जगभरातील विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाणार आहे. महाराष्ट्रातील जालिंदरनगर (खेड, पुणे) येथील जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे.
जालिंदरनगर शाळेचे वेगळेपण
-
‘विषयमित्र’ मॉडेलची अंमलबजावणी केली जाते. वयाच्या विविध स्तरातील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात, ज्यामुळे शिकवण प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली आणि सामूहिक सहभागातून होते.
-
समुदायाचे सहभाग पूर्वी कमी विद्यार्थी संख्येमुळे बंद होण्याच्या दिशेला जाणाऱ्या या शाळेची परिस्थिती स्थानिक समुदायाच्या सहभागामुळे ,सहकार्यामुळे बदलली आहे.
-
शाळेने राबविलेल्या या उपक्रमामुळेअभ्यासाच्या पलीकडे जात, या मॉडेलमुळे शिक्षण अधिक गुणात्मक आणि सहभागी बनलं आहे. या निवडीमुळे गुणात्मक आणि सहभागी शिक्षण मोडेलमुळे सरकारी माध्यमिक शिक्षणाची नव्याने प्रतिष्ठा निर्माण झाली आहे. स्थानिक सहभागाने शाळेची कार्यक्षमता वाढली आहे, विद्यार्थ्यांच्या मनोबलाला चालना मिळाली आहे. शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी यांनी यामुळे आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले.
ब्रिटनमधील टीफोर एज्युकेशन या संस्थेने करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक सहकार्य, पर्यावरण संरक्षणाचे कार्य, नवोन्मेष, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे आणि निरोगी जीवनाला प्राधान्य देणे या बाबींकरिता जगातील सर्वोत्तम पाच शाळांसाठी पुरस्कार सुरू केले. वर्गखोल्यांमध्ये आणि त्यापलीकडे जीवन बदलणाऱ्या शाळांना एक व्यासपीठ प्रदान करणे हा या पुरस्कारांमागील प्रमुख उद्देश आहे.
ऑक्टोबरमध्ये अंतिम विजेत्यांची घोषणा होणार असल्याने आता जनमत संग्रहावर निर्माण होणारा प्रतिसाद निर्णायक ठरणार आहे.