कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आषाढी वारी २०२५ च्या पवित्र निमित्ताने, ज्या हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी चालत निघाले आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत हॅप्पी थेरपी कोल्हापूर आणि हॅप्पी मेडिकेअर महाराष्ट्र तर्फे एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी
बुधवार, दिनांक २५ जून २०२५ रोजी हा उपक्रम राबवण्यात येणार असून, वारी मार्गावर विविध ठिकाणी थांबून मोफत थेरपी व उपचार सेवा देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत :
-
वीस आधुनिक थेरपी मशीनसह खास वैद्यकीय सेवा उपलब्ध
-
हजारो वारकऱ्यांवर मोफत उपचार
-
पायदुखी, पाठदुखी, स्नायू ताण, थकवा अशा वारकऱ्यांच्या त्रासांवर तत्काळ उपाय
-
प्रशिक्षित कर्मचारी व थेरपिस्ट्सची खास टीम
वारी ही एक श्रद्धेची आणि संयमाची यात्रा आहे. त्या प्रवासात शरीर थकले तरी मन थकत नाही, पण थकलेल्या शरीराला पुन्हा सशक्त करण्यासाठी हॅप्पी थेरपी ने घेतलेली ही जबाबदारी खरोखर कौतुकास्पद आहे.