मनगटी घड्याळ्याचा उद्गाता : हॅन्स विल्सडॉर्फ

0
91
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

हॅन्स विल्सडॉर्फचं आयुष्य म्हणजे संकटांवर मात करून यशाचा डोंगर सर करणाऱ्या माणसाची कहाणी आहे. जर्मनीतल्या कुल्मबाख शहरात १८८१ मध्ये त्याचा जन्म झाला. पण अवघ्या १२ व्या वर्षी आई-वडिलांचं छत्र हरवलं. लहान वयातच तो अनाथ झाला. जीवनाने सुरूवातीलाच कठीण परीक्षा घेतली होती. त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. गणित आणि भाषा यामध्ये तो तरबेज झाला. इथेच एका स्विस मित्रामुळे त्याला घड्याळ बनवण्याची आवड निर्माण झाली.

केवळ १९ व्या वर्षी हॅन्सने स्वित्झर्लंड गाठलं आणि एका घड्याळ कंपनीत प्रशिक्षण सुरू केलं. पुढे तो लंडनमध्ये गेला, तिथे त्याने आपलं कौशल्य अजून धारदार केलं. त्याची ओळख अल्फ्रेड डेविसशी झाली आणि १९०५ साली दोघांनी मिळून “Wilsdorf & Davis” ही कंपनी स्थापन केली. सुरुवातीला स्विस घड्याळाचे पार्ट्स आयात करून ब्रेसलेट घड्याळ बनवली जात. हॅन्सचा विश्वास होता की भविष्यात मनगटी घड्याळे (wristwatch) खिशातील घड्याळांपेक्षा अधिक लोकप्रिय होतील.

१९०८ साली त्यांनी आपल्या घड्याळांना “रोलेक्स” हे नाव दिलं. हे नाव सोपं, लक्षात राहण्यासारखं आणि कोणत्याही भाषेत उच्चारायला सोपं होतं. रोलेक्स ने आपल्या दर्जावर भर दिला. १९१० मध्ये रोलेक्सला स्वित्झर्लंडमधून पहिला     क्रोनॉमिटर सर्टिफिकेट मिळाले. जोपर्यंत रिस्टवॉचला इतकी अचूकता मिळाली नव्हती.

पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटनमध्ये जर्मन नागरिकांवर संशय घेतला जात होता. हॅन्सने त्याचा व्यवसाय स्वित्झर्लंडमध्ये हलवला. १९२६ मध्ये रोलेक्सने जगातील पहिले पाण्याचे आणि धुळीपासून पूर्णपणे सुरक्षित असलेले “ऑइस्टर” घड्याळ बनवलं. त्यानंतर १९२७ मध्ये मेरसिडीज ग्लीट्झ या पोहणाऱ्या महिलेने इंग्लिश चॅनेल पार करताना रोलेक्स ऑइस्टर घड्याळ वापरलं आणि घड्याळ पूर्णपणे चालू राहिलं — यामुळे रोलेक्सचं नाव घराघरात पोहचलं.

१९३१ मध्ये रोलेक्सने पहिलं सेल्फ-वाइंडिंग म्हणजेच स्वतः आपोआप चालणारे तंत्रज्ञान आणलं आणि घड्याळविश्वात क्रांती केली. पुढे त्यांनी Datejust, Explorer, Submariner, GMT-Master, Daytona अशी अनेक आयकॉनिक मॉडेल्स आणली.

१९४४ मध्ये पत्नीच्या निधनानंतर हॅन्सने रोलेक्सचे सर्व शेअर्स एका फाउंडेशनमध्ये दिले. आज रोलेक्स ही कंपनी फाउंडेशनतर्फे चालवली जाते आणि जगभर समाजासाठी काम करते.

अनाथ म्हणून जीवनाची सुरुवात केलेल्या हॅन्स विल्सडॉर्फने रोलेक्स ब्रँडला जगातला सर्वोच्च दर्जाचा लक्झरी ब्रँड बनवलं — ही कथा प्रत्येक संघर्ष करणाऱ्याला प्रेरणा देणारी आहे.

——————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here