
इंटरनेटद्वारे मोफत फोनकाॅल्स व व्हिडिओ काॅल्स करता येऊ शकणारे दोन दशकापुर्वी लोकप्रिय असलेले व त्या काळात 66 दशलक्ष ‘युजर्स’ असलेले मायक्रोसॉफ्टचे ‘स्काईप’ मे महिन्यापासून बंद होत आहे.
‘स्काईप’ हे 2003 मधे ईस्टोनिया या देशात प्रथम सुरू झाले. अंतरराष्ट्रीय काॅलिंगचे दर त्यावेळी फार महाग होते. ई-बेय (e-bay) ने 2005 मधे त्यातील 65% भाग (स्टेक्स) विकत घेतले होते व त्यानंतर 2011 च्या अखेरीस मायक्रोसॉफ्ट ने 8.5 अब्ज यूएस डाॅलर्स ‘रोख’ देवून’स्काईप ‘ खरेदी केले.
त्या काळात झपाट्याने लोकप्रिय झालेले स्काईप नंतरच्या काळात स्पर्धेत टिकू शकले नाही व त्याचा वापर झपाट्याने कमी झाला. स्मार्ट फोन प्रस्थापित होण्याआधी व्हिडिओ काॅलिंग जनतेपर्यंत पोहोचवण्याचे व लोकप्रिय करण्याचे श्रेय स्काईप चे आहे. ॲपल चे ‘फेसटाईम’, व्हाॅटसअप यापुढे स्काईप चे महत्त्व कमी झाले. कोरोनाच्या काळात जेव्हा संपर्क माध्यमावर सर्व जग अवलंबून होते त्या काळात ‘झूम’,’गुगल मीट’, ‘वेबेक्स’ यांचा वापर वाढला व स्काईपचा वापर कमी झाला.
मायक्रोसॉफ्टने माध्यमांना संबोधित करताना आम्ही आमच्या ‘युजर्स’ च्या नि:शुल्क वापरासाठी अत्याधुनिक कम्युनिकेशन तंत्रज्ञान असलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट टीम’ या नवीन ॲपवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. या मधे काॅलिंग,ग्रुप काॅल्स, मिटींग्ज, फाईल शेअरिंग, कम्युनिटी तयार करणे आदी फीचर्स असतील.



