spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeमाहिती तंत्रज्ञानमोबाईलचा वापर टाळण्यासाठी एक दिवस मोबाईल उपवास करूया : राजन गवस

मोबाईलचा वापर टाळण्यासाठी एक दिवस मोबाईल उपवास करूया : राजन गवस

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

मोबाईलच्या अतिवापरामुळे होत असलेल्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि पुढील पिढीला या विळख्यातून वाचवण्यासाठी ‘एक दिवस मोबाईल उपवास करूया’ असा सकारात्मक संदेश सुप्रसिद्ध लेखक राजन गवस यांनी दिला.
शाहू स्मारक भवन येथे आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छारुपी संकलित झालेल्या वह्या वाटपाचा कार्यक्रम लेखक राजन गवस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी ही प्रेरणादायी भावना व्यक्त केली. कार्यक्रमात अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छारुपी संकलित झालेल्या वह्या वाटपाचा कार्यक्रम लेखक राजन गवस यांच्या हस्ते पार पडला.
राजन गवस म्हणाले, “सध्याची पिढी मोबाईलच्या आहारी जाऊन त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यांच्या सहनशक्तीचा आणि अपयश झेलण्याच्या क्षमतेचा ऱ्हास होत आहे. त्यामुळेच समाजात याविषयी जागृती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”

 शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.या वेळी उपस्थित मान्यवरांनी देखील मोबाईलच्या योग्य वापराबाबत जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचं मनोबल वाढावं, असा यामागचा प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

उपस्थिती- 
आमदार जयंत आसगांवकर, ऋतुराज पाटील, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची उत्साही आणि प्रेरणादायी सांगता झाली. यावेळी जिल्हा बँकच्या संचालिका स्मिता गवळी, गोकुळचे बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील- चुयेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, राहुल माने, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, भोपाळ शेटे, माजी महापौर मनीषा बुचडे, सुलोचना नायकवडे, नंदू सूर्यवंशी, विनायक फाळके, भारती पवार, तौफिक मुल्लाणी, दिपाली घाटगे, बाजार समितीचे भरत पाटील- चुयेकर, सुयोग वाडकर, विलास साठे, युवराज गवळी, बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर.एस. कांबळे, विनायक घोरपडे यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक लोक उपस्थित होते.

——————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments