नंदवाळ दिंडीला ५ जुलै पासून सुरुवात

0
279
Archive photo of Nandwal Dindi-(Courtesy-Internet)
Google search engine

दिंडीप्रमुख आनंदराव लाड महाराज यांची माहिती

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील दिंडी यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. हा उत्सव  पश्चिम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील श्रद्धेची प्रतीक ठरलेला आहे. यावर्षी ५ जुलैपासून या दिंडीला सुरुवात होणार असून, पारंपरिक रिंगण सोहळ्याची तयारी व नियोजन करण्याचे आवाहन दिंडीप्रमुख आनंदराव लाडमहाराज यांनी केले आहे. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळाची नियोजन बैठक पार झाली. बैठकीत या उत्सवाचा आढावा घेण्यात आला.

यावर्षी ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी भवानी मंडप येथे नगर प्रदक्षिणा, गोल रिंगण, सासने इस्टेट टिंबर मार्केट येथे प्रवचन व विसावा आणि ६ जुलै रोजी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून सकाळी ७ वाजता दिंडीचे नंदवाळकडे प्रयाण होणार आहे. 

अंतिम तयारीसाठी २७ जूनला बैठक

दिंडी नियोजनासाठी अंतिम तयारीची बैठक शुक्रवार, दि. २७ जून रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. दुपारी चार वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या बैठकीस प्रशासन, वाहतूक, महापालिका अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळातर्फे देण्यात आली.
बैठकीस भगवान शिवले, सखाराम चव्हाण, बाळासो गुरव, गजानन पारखे, गंगाधर दास, ज्योती पाटील, सखाराम जाधव, अजित चव्हाण, संतोष रांगोळी यांच्यासह अनेक वारकरी उपस्थिती होती.
————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here