पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
जोतिबा डोंगर येथील रहदारीला अडथळा ठरणारे विना वापर विद्युत आणि टेलिफोन खांब आहेत जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या उपमार्गावरील विद्युत वाहिन्या धोकादायक स्थितीत लोंबकळत असून त्याचा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. असे विनावापर खांब काढण्याची मागणी जोतिबा ग्होरामस्तथांमधून होत आहे.
जोतिबा गावातील रहदारीच्या मार्गावर अडचणीचे ठरणारे अनेक विनावापर विद्युत आणि टेलिफोन खांब आहेत. जोतिबा मंदिराकडे जाण्यासाठी उपाध्ये गल्ली हा उपमार्ग आहे. गर्दीच्या वेळी याच जवळच्या मार्गाचा वापर भाविक करतात. सध्या मात्र या मार्गावर हायव्होल्टेज विद्युत तारा लोंबकाळत असून विद्युत वाहिनीचे खांब पडण्याच्या स्थितीत आहेत. एकाच ठिकाणी दोन विद्युत वीजेचे खांब उभे करून विद्युत ताराचा गुंता झाला आहे.
वारा पाऊसाच्या वेळी तारांचे घर्षण होऊन त्याच्या ठिणग्या पडत असतात. या मार्गावरून मोठी वर्दळ सुरु असते. खाजगी दवाखाना, औषध दुकाने, दळप कांडप गिरण, किराना दुकान्याची संख्या जास्त आहे यामुळे गावातील नागरिकांची या परिसरात नेहमीच गर्दी असते. लोबंकळ्णाऱ्या तारावरून उडया मारताना विजेचा करंट बसून दोन माकडाचा जीव गेल्याच्या दुर्दवी घटना घडली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता या मार्गावरील विद्युत वाहिनी भूमिगत करणे गरजेचे आहे. विद्युत तारांचा करंट बसून जीवतहानी होण्याअगोदरच भूमिगत विद्युत वाहिनी करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.







