spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगजास्त अकाउंटमुळे स्कोअर खराब होऊ शकतो..

जास्त अकाउंटमुळे स्कोअर खराब होऊ शकतो..

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर अनावश्यकपणे अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाऊ शकते. याचबरोबर सीआयबीआयएल स्कोअर देखील खराब होऊ शकतो. एकापेक्षा जास्त बँक खाती असण्याचे तोटे असे आहेत.

बचतीवर परिणाम

एकापेक्षा किती बँक खाती उघडायची याबाबत कोणतीही मर्यादा नाही. प्रत्येकजण आपल्या उद्दिष्टांनुसार एक किंवा अधिक बँक खाती उघडू शकतो.  एकापेक्षा जास्त खाती असणे ही एक धोरणात्मक रणनीती असू शकते, ज्यामुळे  बचतीला दैनंदिन खर्चापासून वेगळे करू शकता.

एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असल्याने प्रत्येक खाते चालू ठेवण्यासाठी एक निश्चित रक्कम ठेवावी लागते. म्हणजे  एकापेक्षा जास्त खाती असतील तर पैसे अडकून राहू शकतात. त्या रकमेवर जास्तीत जास्त ४ ते ५ टक्के वार्षिक परतावा मिळतो. दुसरीकडे, बचत खात्याऐवजी इतर योजनांमध्ये पैसे गुंतवले तर वार्षिक परतावा म्हणून जास्त व्याज मिळेल.

अतिरिक्त शुल्क आकारले जातात
अनेक खाती असतील तर वार्षिक देखभाल शुल्क आणि सेवा शुल्क द्यावे लागेल. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त बँक तुमच्याकडून इतर बँकिंग सुविधांसाठी देखील शुल्क आकारते. त्यामुळे येथे देखील खूप पैसे तोटा सहन करावा लागतो.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम
एकापेक्षा जास्त निष्क्रिय खाती असण्याचा क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होतो. खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याने क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो म्हणून कधीही निष्क्रिय खाती हलक्यात घेऊ नयेत आणि नोकरी सोडताच जुने बँक खाती बंद करावीत.

अधिक बँकांमध्ये खाती असल्याने टॅक्स भरताना अनेक अडचणी येतात, कागदपत्रांमध्येही गुंतागुंत होते. तसेच, आयटीआर भरताना सर्व बँक खात्यांशी संबंधित माहिती ठेवावी लागते. बऱ्याचदा स्टेटमेंटची नोंद गोळा करणे खूप गुंतागुंतीचे काम बनते आणि सर्व बँकांची माहिती दिली नाही तर, आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकता.

सॅलरी अकाउंट बनेल बचत खाते
तीन महिन्यांपर्यंत अकाउंटमध्ये पगार जमा झाला नाही तर ते बचत खात्यात रुपयांतरित होते. बचत खात्यात रूपांतरित झाल्यानंतर खाते बदलण्याबाबत बँक नियम बदलतात. बँकेच्या नियमांनुसार बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे नाहीतर, दंड भरावा लागू शकतो आणि बँक खात्यात जमा केलेल्या रकमेतून पैसे कापू शकते.

———————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments