मुख्यमंत्र्यांनी आखून दिलेल्या या आराखड्या अंतर्गत महसूल विभागाने प्रामुख्याने कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता, नागरिकाभिमुखता, जलद सेवा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शेतकरी, भूमिहीन, सामान्य नागरिक यांच्यासाठी प्रशासन अधिक सुलभ करण्यावर भर दिला आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना उद्देशून सातत्याने आढावे घेतले असून, ठरवलेल्या ध्येयपूर्तीला गती दिली आहे.
महसूल मंत्री बावनकुळे –
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागापुढे स्पष्ट दिशा आणि उद्दिष्ट ठेवले. आम्ही शंभर दिवसांत ही उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न केला. यामुळे महसूल विभाग आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अधिक पारदर्शक, जलद व नागरिकाभिमुख बनत आहे. येत्या काळात हेच सुधारित मॉडेल इतर विभागांनाही दिशा देईल,” असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
या सुधारणा लागू झाल्यापासून सामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. विविध सेवांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी झाली असून कामे वेळेत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
राज्यातील महसूल विभागाच्या या यशस्वी शंभर दिवसांचा आराखडा भविष्यातील सुशासनासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
——————————————————————————————-



