प्रसारमाध्यम डेस्क
राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. आयटीआय अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी ३ जुलै रोजी जाहीर होणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. त्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश होणार आहेत. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या प्रक्रियेतील प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर होणार आहे. या गुणवत्तायादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी ३० जून ते एक जुलैपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. अंतिम गुणवत्ता यादी तीन जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. पहिल्या फेरीतील निवड यादी नऊ जुलैला प्रसिद्ध होणार आहे. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० ते १५ जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
आयटीआय प्रवेशाचं वेळापत्रक :
ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे, २६ जूनपर्यंत प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करणे, ३० जून गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे, ३० जून ते १ जुलै अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, ३ जुलै
पहिली प्रवेश फेरी :
पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करणे, ९ जुलै यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष प्रवेश घेणे, १० ते १५ जुलै दुसरी प्रवेश फेरी, १० ते २८ जुलै तिसरी प्रवेश फेरी, २३ जुलै ते ८ ऑगस्ट चौथी प्रवेश फेरी, ४ ते १९ ऑगस्ट संस्थास्तरीय समुपदेशन फेरी, २१ ते २८ ऑगस्ट खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश, १० जुलैपासून..