कुंडलीतील चार्तुस्थानावरून उच्च शिक्षणाचे तर पंचम स्थानावरून उदरनिर्वाहरित्या शिक्षणाचे भाकीत वर्तवतात. गुरु हा उच्च ग्रह शिक्षणासाठी अत्यंत पूरक व उपकारक असून बुध ग्रह व्यावहारिक शिक्षणास चालना देतो. हर्षल हा संशोधन शिक्षणाचा कारक ग्रह समजला जातो. आपला शैक्षणिक प्रभाव विशेषत्वाने दाखवतो.
मिथुन कन्या राशीचा बुध चतुर्थस्थानात अस्ता भद्रयोग करतो व त्यामुळे ती व्यक्ती शिक्षणक्षेत्रात मुलभूत स्वरुपाची भरीव कामगिरी करू शकते. लग्नस्थान, चतुर्थ व पंचमस्थानातील रवी उत्तम शैक्षणिक यश मिळवून देतो.
पंचम स्थानामध्ये शुभ ग्रहाची राशी असेल किंवा या स्थानावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल. शुभ ग्रहाची युती संबंध असेल तर अशी गृहस्थिती मनुष्याला निश्चितपणे बुद्धिमान बनवते. पंचमस्थानाचा स्वामी स्वतःच्या उच्च राशीत असेल, किंवा शुभ ग्रहांच्या दरम्यान असेल तरी ती व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असते.
गुरु केंद्र किंवा त्रिकोणस्थानात असतानाही व्यक्ती बुद्धिमान असते.
बुध पंचमस्थानात असेल तसेच पंचमेशही प्रबळ होऊन केंद्रात स्थानापन्न झालेला असेल.
पंचमेशाचा शुभ ग्रहांशी युती किंवा दृष्टी संबंध असेल तर ती व्यक्ती निश्चितपणे बुद्धिमान बनते. पंचामेशाचा उच्च राशीत असेल तरीही व्यक्ती बुद्धिमान बनते. पंचमेश केंद्र स्थानात असून शुभ ग्रहांनी युक्त असेल आणि बुध व गुरु केंद्र त्रिकोणात प्रबळ होऊन विराजमान झालेले असतील, तर त्यामुळे त्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता सुधारते.
पंचमेश व गुरु शुभ शष्टअंशात असेल, तसेच पंचमेश व बुध व गुरुपैकी एक ग्रह गोपुरांशामध्ये विराजमान झालेला असेल तर त्यामुळे अशी व्यक्ती बुद्धिमान बनते.
कुंडलीमध्ये चंद्र, बुध, व गुरु हे ग्रह प्रबळ असून. त्यांचे शुभ ग्रहांशी युती दृष्टी संबंध असतील तर ती व्यक्ती निश्चितपणे बुद्धिमान बनते.
द्वितीय स्थान, द्वितीयेश व गुरु केंद्र त्रिकोणात विराजमान होऊन प्रबळ बनलेली व्यक्ती निश्चितपणे. बुद्धिमान बनते.
शनी, राहू व केतू या तीनपैकी एखादा ग्रह गुरुयुक्त असून त्यावर शुक्राची दृष्टी असेल तर अशी व्यक्ती सामान्य गरीब कुटुंबात जन्माला येऊनही केवळ अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करते व देदिप्यमान यश मिळवते.
शिक्षणात अडथळे आणणारे कुंडलीतील ग्रहमान पंचमस्थानाचा स्वामी सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानात विराजमान झालेला असेल तर शिक्षणात अडथळे येतात.
पंचमेश पाप ग्रहांबरोबर विराजमान असेल तर, पंचमेश स्वस्थानापासून सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानात असेल तर,पंचमस्थानात नीच किंवा सुभ ग्रह असेल तर, शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी ९ रत्ती वजनाचे पुष्कराज किंवा त्याचे उपरत्न आणि ९ रत्ती वजनाचा मोती ही तिन्ही रत्ने चांदीच्या लॉकेटमध्ये जडवून कोणत्याही गुरूवारी किंवा बुधवारी गळ्यामध्ये धारण केल्याने शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात.
पाचू किंवा त्याचे उपरत्न, गोमेद व मोती हे तिन्ही नऊ रत्ती वजनाची रत्ने लॉकेटमध्ये जडवून धारण केल्याने अभ्यासात मन लागते. स्मरणशक्ती वाढून परीक्षेत चांगले गुण मिळतात.
वास्तुशास्त्राचा विचार करता. मुलांना अभ्यास करण्यासाठी पूर्व आणि उत्तर या दिशा चांगल्या मानल्या जातात. या दिशेस बेडरूम असल्यास मात्र अशुभ फळे मिळतात.
घरामध्ये मुलांच्या अभ्यासासाठी वेगळी खोली असावी. परंतु मुलांनी स्टडीरूम मध्ये कधी ही खेळू नये व खेळणी ही स्टडीरूम मध्ये ठेवू नयेत. खेळणी बेडरूम मध्ये ठेवलीत तर योग्य.
मुलांची बेडरूम घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेस असावी. मुलांची बेडरूममध्ये पिरॅमिडची स्थापना करून जास्त शुभ फळे मिळतात. मुलांनी ध्यानधारणा, योग साधना, चिंतन, आत्मपरीक्षण करण्यासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर या दिशा सर्वोत्तम मानल्या आहेत.
मुलांचे जर अभ्यासामध्ये लक्ष्य लागत नसेल, अभ्यासाची भीती वाटत असेल, वाचलेले लक्षात राहत नसेल, किंवा ऐन परीक्षेच्या वेळी विसरणे, मन एकाग्र होणे यासाठी मुलांनी नेहमी दररोज रात्री पूर्वेकडे डोळे करूनच झोपावे. सव्वापाच रत्ती वजनाचा मोती व सव्वापाच रत्ती वजनाचे पोवळे चांदीच्या अंगठीत बनवून करंगळी व अनामिके मध्ये धारण करावे.
अभ्यास करताना मनःस्थिती चांगली असावी लागते, त्यासाठी भगवान शंकराची उपासना करावी.
मंत्र : ॐ शिवाय नमो नमः |
ॐ शिवाय नमः |
ॐ निर्भयाय नमो नमः |
ॐ निर्भयाय नमः |
ॐ शक्तये नमो नमः |
ॐ शक्तये नमः |
ॐ पाशाय नमो नमः |
ॐ पाशाय नमः |
ॐ करुणाय नमो नमः |
ॐ करुणाय नमः |
हा मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.
४ मुखी रुद्राक्ष वापरल्यामुळे किंवा गणेश रुद्राक्ष वापरल्यामुळे मनःस्थिती स्थिर राहते. सकारात्मक उर्जेचा विकास होऊन नकारात्मक उर्जेचा ऱ्हास होतो. परीक्षा, स्पर्धा, परीक्षेत चांगले यश मिळते. अभ्यासाची गोडी लागते. बुद्धी कुशाग्र बनते.
सरस्वतीस विद्येची देवता मानली जाते. त्यामुळे सारास्वतीमातेची स्थापना स्थापना करून पूर्वेकडे तोंड करून पूजा करावी.
ॐ नमो ॐ श्री वद-वद वाग्वादिनी
बुद्धी वर्द्वय ॐ ऱ्हीं नमः स्वाहा ||
हा मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.
– जोतिषविशारद मानसी पंडित
—————————————————————————————————-






