राहुल बजाज : स्वदेशी उद्योगांचे शिल्पकार

0
386
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

राहुल बजाज हे भारतातील एक प्रतिष्ठित उद्योजक, राजकारणी आणि समाजसेवक होते. भारतातील उद्योग क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी १९६५ मध्ये  बजाज ग्रुपचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.५ कोटींवरून १२ हजार कोटीं रुपयेपर्यंत वाढली. बजाज चेतक स्कूटर हे त्यावेळी भारतीय मध्यमवर्गाचे प्रतीक बनले. आजही बजाज चेतक बाईक जोरात चालते. त्यांच्या कार्यामुळे ते “हमारा बजाज” या घोषवाक्याचे खरे प्रतीक ठरले. आज राहुल बजाज यांचा जन्म दिवस यानिमित्त…

राहुल बजाज हे स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू होते. जमनालाल महात्मा गांधींचे निकटवर्ती होते. राहुल यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी तर मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी एमबीए  पूर्ण केले. त्यांनी बजाज ग्रुपचे नेतृत्व १९६५ मध्ये स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.५ कोटींवरून १२ हजार कोटींपर्यंत वाढली. ते २००६ ते २०१० दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना २००१ मध्ये राहुल यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. ते दोन वेळा भारतीय उद्योग परिसंस्थेचे अध्यक्ष होते. त्यांना २०१७ मध्ये त्यांना सीआयआयचा लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला.

राहुल यांनी इंडियन एअरलाइन्सचे अध्यक्ष, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या इंटरनॅशनल बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष, आयआयटी मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या साउथ एशिया अ‍ॅडव्हायजरी बोर्डचे सदस्य म्हणून काम केले.

राहुल बजाज यांचे जीवन आणि कार्य हे भारतीय उद्योगजगतातील प्रेरणादायक उदाहरण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ग्रुपने अभूतपूर्व यश मिळवले. परकीय कंपन्यांच्या प्रभावाखाली न जाता, त्यांनी स्वदेशी उत्पादनांवर भर दिला. 

राहुल बजाज यांनी त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या बजाज ऑटो कंपनीचे नेतृत्व करताना भारतात दुचाकी वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवले. त्यांनी बजाज स्कूटर (विशेषतः “हमारा बजाज”) हे नाव घराघरात पोहोचवले. यामुळे भारतीय मध्यमवर्गासाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह वाहनांचा पर्याय निर्माण झाला. १९७० आणि ८० च्या दशकात भारतात परदेशी गुंतवणूक मर्यादित असताना, राहुल बजाज यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवले. त्यांनी मोठ्या प्रमाणात स्थानिक उत्पादनावर भर दिला आणि आयातीवर अवलंबित्व कमी केले. त्यांनी आत्मनिर्भर भारताची सुरुवात केली. बजाज कंपनीच्या जाहिरात मोहिमांमधून राहुल बजाज यांनी भारतीयांच्या मनात एक अभिमानाची भावना निर्माण केली. “हमारा बजाज” ही टॅगलाईन केवळ स्कूटरसाठी नव्हती, तर ती भारतीय स्वदेशी उत्पादकतेचे प्रतीक बनली. राहुल बजाज हे नुसतेच यशस्वी उद्योजक नव्हते, तर नैतिकता आणि पारदर्शकतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ग्रुपने फक्त नफा न पाहता सामाजिक जबाबदारीही स्वीकारली.

राहुल बजाज यांचे योगदान केवळ व्यवसायापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी भारतीय मानसिकता, आत्मनिर्भरता आणि स्वदेशी चळवळीला एक औद्योगिक दिशा दिली. ते खऱ्या अर्थाने स्वदेशी उद्योगांचे शिल्पकार मानले जातात.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here