कुरुंदवाड : प्रसारमाध्यम न्यूज
आज वटपौर्णिमा. सण सौभाग्याचा…सण…पावित्र्याचा….आजचा दिवस सर्व महिलांसाठी आनंददायी असतो. सावित्रीच्या निष्ठेचे प्रतीक आणि साताजन्माचे समर्पण दर्शविणारी वटपौर्णिमा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे !
आजच्या या दिवशी वटवृक्षाचे पुजन करुन सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी मनोभावे पुजा करतात. याला आध्यात्मिक, वैज्ञानिक, शास्त्रीय महत्व आहे. वटवृक्षामुळे मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन मिळते. मात्र, काहीच्या मते वटपौर्णिमा म्हणजे सातजन्म हाच पती मिळावा यासाठी करण्यात येणारी पुजा असा समज आहे.
प्रत्यक्षात मात्र सौभाग्य म्हणजे पती, धन धान्य, ऐश्वर्य, आरोग्य, पुत्रपौत्र इ.असा अर्थ आहे. अशी सौभाग्यप्राप्ती व्हावी यासाठी आज वटपौर्णिमेनिमित्त गल्लीतील, काॅलनीतील, सोसायटीतील महिला एकत्रित येऊन वटवृक्षाचे पुजन करतात.काही ठिकाणी वटवृक्ष नसल्यामुळे वडाच्या रोपाचे पूजन करण्यात आले. तर काही ठिकाणी वटवृक्ष आहे तिथे महिलांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
पूजे साठी महिलांनी विविध सौभाग्य अलंकार परिधान केले होते. वटवृक्षाचे विधीवत पुजन करुन वृक्षाला पाच फेर्या मारीत अखंड सौभाग्यप्राप्तीची प्रार्थना करीत झाडाला दोरा गुंडाळला. यानतंर सर्व महिला एकमेकींना हळदी-कुंकु लावून विविध फळे देऊन ओटी भरत होत्या. अखंड सौभाग्यवती व सौभाग्यप्राप्ती भव.. अशा शुभेच्छा व आशिर्वाद देत होत्या.
प्रातःकालपासून सुर्यास्ता पूर्वी पर्यंत वटवृक्षाजवळ पूजन करण्यासाठी नटुन-थटुन सौभाग्यवतीची गर्दी होती. तसेच साजशृंगारातील छबी मोबाईलवरुन टिपण्यासाठी मैत्रिणी एकमेकांना मदत करत होत्या. वटपौर्णिमेनिमित्त सर्व सौभाग्यवती महिला आज उपवास करतात.
—————————————————————————————————–






