धनगरवाड्यांना आमदार शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

0
121
District Collector along with MLA Shivaji Patil visited Dhangarwadi.
Google search engine


चंदगड प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज 

आमदार शिवाजी पाटील यांनी तालुक्यातील धनगरवाड्या संदर्भात विधानसभेत समस्या मांडून आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक ते आदेश संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दिले. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी चंदगड तालुक्यातील १४ धनगर वाड्यांचा दौरा करून तेथील परिस्थितीची पाहणी केली.

धनगर वाड्यावर नसणाऱ्या रस्ते,पाणी,आरोग्य, शिक्षण, मोबाईल नेटवर्क यासारख्या अनेक समस्या जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील स्थानिक नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिकांनी लवकरात लवकर विकास कामांना प्राधान्य देण्याची मागणी  केली.

जिल्हाधिकारी यांनी देखील स्थानिक नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here