प्रसारमाध्यम युनिमीडिया प्रा. लि. या माध्यम समूहाच्या वतीने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर सांगोपांग वैचारिक मंथन करण्याच्या उद्देशाने ”शिक्षण संवाद ” ही शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) च्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी याचे आयोजन करण्यात येत असून हा उपक्रम भारतातील शिक्षण व्यवस्था आणि राष्ट्रीय विकास यामधील दरी भरून काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
यापूर्वींच्या शिक्षण परिषेदतील महत्त्वाचे क्षण..
प्रसारमाध्यम युनिमीडिया प्रा. लि. संस्थेने याचे आयोजन केले असून गेली २५ वर्षे ही संस्था माध्यम व समाजाभिमुख उपक्रम राबवित आहे. तसेच २०११ पासून सातत्याने शैक्षणिक क्षेत्रासाठी काम करणारी अग्रगण्य माध्यम संस्था म्हणून नावारुपास आली आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व सकारात्मक बदलासाठी सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम राबविले जात असतात.
शिक्षण संवाद : शैक्षणिक परिषद
NEP 2020 ही शैक्षणिक क्षेत्रासाठी एक क्रांतिकारी दिशा असून विद्यार्थीकेंद्री, लवचिक आणि सर्वसमावेशक अशी तिची रचना २१ व्या शतकाच्या जागतिक ज्ञानसमाजाशी सुसंगत आहे. शिक्षण संवाद परिषदेद्वारे धोरणाच्या मूळ संकल्पनेपासून ते स्थानिक अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास समजावून सांगण्याचा आणि कृतीयोग्य उपाय राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या परिषदेतील सहभाग :
५० तज्ज्ञ वक्ते – शिक्षणतज्ज्ञ, धोरण निर्माते, उद्योगपती, विद्यार्थी प्रतिनिधी, अॅडटेक कंपन्या
१००० तासांचे ज्ञानसंपन्न व्हिडीओ बँक – सत्र, पॉलिसी ब्रेकडाउन, केस स्टडी, संशोधन
सर्व स्तरांतील सहभाग – शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सरकारी यंत्रणा, उद्योग, एनजीओ, स्टार्टअप्स
एकत्रित डिजिटल व्यासपीठ – थेट संवाद, नेटवर्किंग, साधने व सत्र
समाधानाधिष्ठित कार्यक्रम – अंमलबजावणीच्या योजना, अडचणी आणि उपाय
परिषदेतील प्रमुख मुद्द्यांचा आढावा :
व्यावसायिक शिक्षणातील सुधारणा – शिक्षक शिक्षण, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी
अंमलबजावणीतील अडचणी – महाराष्ट्रातील संस्थांच्या अडचणी, अपूर्ण अधोसंरचना, आर्थिक मर्यादा
समावेशक शिक्षणावर भर – सामाजिक समावेशन आणि प्रवेशासाठी ठोस रणनीती
धोरण विश्लेषण – 5+3+3+4 रचना, मातृभाषेतील शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्य शिक्षणाचा समावेश
व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुनर्रचना – लवचिक अभ्यासक्रम, कौशल्याधिष्ठित शिक्षण
स्पेशल पॉडकास्ट मालिका :
५० भागांची विशेष पॉडकास्ट सिरीज युट्यूब व सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार असून, यामध्ये तज्ञांशी संवाद, NEP चा विश्लेषणात्मक आढावा, अंमलबजावणीच्या अडचणी आणि उपाय यांचा समावेश असेल.
सर्वत्र पोहोचणारा प्रचार :
प्रसारमाध्यम युनिमीडियाचा सर्व माध्यमांवरील सशक्त प्रचार प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया, होर्डिंग्ज, युट्यूब, फेसबुक इ. द्वारे कोणताही भागधारक मागे राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
राज्यस्तरीय नेतृत्वासाठी संधी :
या उपक्रमातून ब्रँडला राज्यस्तरावरील दृश्यमानता मिळणार असून, सहभागी संस्था व व्यक्तींना धोरण बदलाच्या प्रक्रियेचा भाग होण्याची संधी दिली जाईल.
प्रसारमाध्यम युनिमीडिया प्रा. लि. ही गेली २५ वर्षे राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांसोबत समाज-आधारित विषयांवर प्रभावी काम करणारी माध्यम संस्था असून, शिक्षण विषयक परिषदांचे आयोजन व धोरण संवादासाठी तिचा उल्लेखनीय अनुभव आहे.