बांबरवाडीत बिबट्यासह चार बछड्यांचे दर्शन..

0
104
Leopard sighting at the foot of Panhala Fort
Google search engine

पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज 

पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी गावाशेजारील डोंगरात ग्रामस्थांना बुधवारी सायंकाळी बिबट्यासह चार बछड्यांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

पन्हाळा गडाच्त्र्याया परिसरात बिबट्च्याया वावर नेहमीचाच आहे. बुधवारी सायंकाळी पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या बांबरवाडी गावाशेजारील डोंगरात ग्रामस्थांना बिबट्यासह चार बछड्यांचे दर्शन झाले. या परिसरातील कुत्र्यांच्या भुंकण्याने  बिबट्यासह एक बछडा बाजूला गेला, तर तीन बछडे त्याचपरिसरात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याच्या आवाजाच्या दिशेने ग्रामस्थांनी चौकशी केली असता बिबट्यासह चार बछडी दिवसा फिरताना दिसली. त्या ठिकाणाहून दुसरीकडे जाताना कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्यासह बछड्यांची ताटातूट झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

गावाच्या शेजारी बिबट्यासह बछड्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या या परिसरात शेतीच्या कामासाठी नागरिकांची मोठी वर्दळ सुरु आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here