संजय गांधी निराधार योजनेच्या रक्कमेत वाढ व्हावी. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू : आमदार सतेज पाटील

0
244
The amount of Sanjay Gandhi Niradhar Yojana should be increased. We will follow up at the government level for this; MLA Satej Patil
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क 

योजना आणून काँग्रेस पक्षाने गोरगरिबांना आधार देण्याचं काम केले. संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासह इतरही काही योजनांच्या रक्कमेत वाढ व्हावी. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू. अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.   

माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा 31 मे रोजी वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाच औचित्य साधून, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील 100 लाभार्थ्यांना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अजिंक्यतारा कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, संजय गांधी निराधार योजना त्याचं बरोबर श्रावण बाळ योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्याचे काम होत आहे.

1980 साली काँग्रेस पक्षानेसंजय गांधी निराधार योजना सुरू केली. या माध्यमातून लाखो लोकांना आधार देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. अशा अनेक योजना काँग्रेस पक्षाने सुरू करून गोरगरिबांना आधार देण्याचं काम केले. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यासह इतरही योजनांच्या रक्कमेत वाढ व्हावी. यासाठी आपण व्यक्तिशः शासन स्तरावर पाठपुरावा करू. अशी ग्वाही देखिल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली.

माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद मला प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. महाविकास आघाडीचे सरकार नसले तरी योजनेच्या रक्केमत वाढ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी मदत करु अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. शरद सोनुर्ले यांनी, आमदार सतेज पाटील पालकमंत्री असताना त्यांच्यामुळे जिल्हयातील अनेक गोरगरिबांना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला. श्रावणबाळ योजना त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील काही जाचक अट्टी शिथिल करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी दक्षिण विधानसभा युवक अध्यक्ष मयूर पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केल. दरम्यान यावेळी, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि मयूर पाटील यांचा वाढदिवस, योजनेतील वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, राजू साबळे, रियाज सुभेदार, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय शेळके,उमेश पाडळकर, आशिष पाटील, मुस्ताक मलबारी, दस्तगीर शेख, विश्वविक्रम कांबळे आदी उपस्थित होते.

——————————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here