शाहुवाडी तालुक्यातील पिकांना जंगली प्राण्यांचा उपद्रव..

0
354
Wild animals are causing damage to crops in Shahuwadi taluka.
Google search engine

शाहुवाडी प्रतिनिधी: प्रसारमाध्यम न्यूज 

शाहुवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शाहुवाडी तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे. हा  उपद्रव रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून मागणी  होऊ लागली आहे.

शाहुवाडी तालुक्यातील वारणा रेठरे तुरुकवाडी, सोंडोली, गोंडोली , शितूर वारूण आदी भागात रानगव्यापासून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर काही भागात बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत . सातत्याने होणाऱ्या हल्यात शेतकऱ्याची पाळीव जनावरे ठार होत आहेत.

शाहुवाडी तालुक्यातीत शिंपे, सवते, पाटणे, सावे, शिरगाव ,सांबू या भागातील ऊस पिकाचे रानडुकरे नुकसान करत आहेत. सुपात्रे, साळशी, पिशवी, सोनवडे खुटाळवाडी, खोतवाडी ,वरेवाडी या भागात मोर, लांडोर, माकड, गवे या प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यामुळे येथील शाहुवाडी तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. हा वन्य प्राण्यांकडून होणारा उपद्रव थांबवण्यासाठी वनविभागाने त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here