spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeशिक्षणएमपीएससी पूर्व परीक्षा १ जूनला; परीक्षार्थीनी दीड तास आदी परीक्षा केंद्रावर पोहोचणे...

एमपीएससी पूर्व परीक्षा १ जूनला; परीक्षार्थीनी दीड तास आदी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ जून २०२५ रोजी होणार आहे. ज्या उमेदवारांना प्रवेश मिळाला आहे, त्यांची प्रवेशपत्रे एमपीएससीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी हे प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट करणे अनिवार्य आहे. परीक्षार्थीनी परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

आयोगाच्या वेबसाईटवर प्रवेशपत्रे उपलब्ध आहेत. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करावे लागेल. परीक्षेस प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच त्यासोबत ओरिजिनल आयडी प्रुफ सोबत असणे आवश्यक आहे, त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. याचा अर्थ, प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढणे आणि ती परीक्षा केंद्रावर सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

परीक्षेच्या दिवशी काही समस्या येऊ शकतात. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे एमपीएससीने म्हटले आहे. त्यामुळे, उमेदवारांनी परीक्षा वेळेच्या आधी केंद्रावर पोहोचणे महत्त्वाचे आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश मिळणार नाही. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वेळेचे पालन करणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करताना काही अडचण आल्यास, एमपीएससीने मदत करण्यासाठी ईमेल आयडी आणि दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. contact-secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. तसेच, ०२२६९१२३९१४  किंवा ७३०३८२१८२२  या क्रमांकावर फोन करून मदत मागता येईल. त्यामुळे, सर्व उमेदवारांनी MPSC एमपीएससीच्या सूचनांचे पालन करून परीक्षेची तयारी करावी.

 

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments