तेऊरवाडी गावामध्ये चाळोबा गणेश हत्तीचा फेरफटका

0
296
Chaloba Ganesh Hatti
Google search engine

चंदगड : प्रसारमाध्यम न्यूज

गेले महिनाभर कर्नाटकातील बेकिनकेरे व महाराष्ट्रातील महिपाळगड परिसरात वावरणाऱ्या चाळोबा गणेश हत्तीने परतीचा प्रवास चालू केला असून आज सकाळी सात च्या सुमारास तेऊरवाडी ( ता चंदगड ) गावामध्ये फेरफटका मारला.

मार्च व एप्रिल महिन्यात हा हत्ती तेऊरवाडी चिंचणे परिसरात ठाण मांडून राहिला होता. या परिसरातील ऊस पिकांचे ,केळी व नारळी च्या झाडांचे नुकसान करत या हत्तीने कर्नाटकातील बेकिनके परिसरात मोर्चा वळवला होता. या परिसरात कार, ट्रॅक्टर, बैलगाडी आदी गाड्यांचे प्रचंड नुकसान केले. 

आज दि २७ रोजी हा हत्ती तेऊरवाडी गावामध्ये दाखल झाला. येथील कोवाड तेऊरवाडी रस्त्या लगत फडेवाडी नवीन वसाहतीत असणाऱ्या तलावात उतरून नंतर गावंदर शेतातून डोंगराच्या दिशेने निघून गेला. सकाळी सकाळी गावामध्ये हत्ती दाखल झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. सध्या या हत्तीने आजऱ्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला सुरवात केली असली तरी तेऊरवाडी – हडलगे जंगलात बांबू असल्याने पुन्हा एकदा हा हत्ती येथे स्थिरावण्याची शक्यता आहे.

——————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here