चंदगड प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते चंदगड तालुक्याच्या एसटी आगारात आलेल्या पाच नवीन गाड्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला .”
चंदगड तालुक्यातील सर्वच वाड्यावस्त्यावर शाळांची सोय नाही .त्यामुळे अनेक मुलांना शाळेसाठी परगावी जावे लागते. या मुलांची वाहतुकीची सोय व्हावी या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करून चंदगड, गडहिंग्लज, आजरा या एसटी आगारानां नवीन गाड्या द्याव्यात यासाठी आपण आग्रह केला होता. माझ्या या मागणीचीमहाराष्ट्र शासनाने दखल घेतल्याने आज चंदगड आगारात हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे”, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. ”
या एस टी बसच्या येण्याने चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या प्रवासाची उत्तम सोय होणार आहे,” असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ,मंगेश चिवटे,रवींद्र बांदिवडेकर, अनिल शिवनगेकर,वाहतूक नियंत्रक सतीश पाटील ,जयवंत सुतार, अंकुश गवस, अमेय सबनीस, कलिंग मदार, अशोक गडदे, नंदकुमार गावडे व एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, चालक, वाहक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.