कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसची तिरंगा यात्रा संपन्न झाली. या तिरंगा यात्रेमध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगांवकर, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, राजूबाबा आवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून सुरु झालेल्या या यात्रेमध्ये महापालिका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भारतमातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी जयघोष केला गेला.

उपस्थिती-
जि. प. माजी अध्यक्ष राहुल पाटील (सडोलीकर) , गोपाळ पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राहुल देसाई, शशांक बावचकर, राजू लाटकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, माजी नगरसेवक राहुल माने, मधुकर रामाणे, संजय मोहिते, ईश्वर परमार, दुर्वास कदम, तौफीक मुल्लाणी यांच्यासह विद्याधर गुरबे, विनायक घोरपडे, संदीप पाटील, संतोष पाटील, अनंत पाटील, माजी सैनिक, एन. एन. पाटील, अशोक माळी, रघुनाथ पाटील, शशिकांत साळोखे, रत्नाकर शिरोळे, तानाजी चव्हाण, शिवाजी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————————————————————



