कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
स्वातंत्र्य भारतात जन्मलेले भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. त्यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रभावी आणि उल्लेखनीय ठरली आहे. त्यांचा राजकीय प्रवास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक ते पंतप्रधान व्हाया मुख्यमंत्री असा आहे. मोदी सलग बारा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पंतप्रधान पदाच्या दोन टर्म पूर्ण करून आता त्यांची तिसरी टर्म सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाचा संक्षिप्त आढावा :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपमध्ये प्रवेश :
-
१९५० : नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला.
-
१९७० चे दशक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ते एक प्रचारक म्हणून कार्यरत होते.
-
१९८० चे दशक: आरएसएस द्वारे भारतीय जनता पक्षात (बीजेपी) त्यांचा प्रवेश झाला.
-
भाजपमध्ये त्यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत पक्षाला बळकट करण्याचे काम केले.
गुजरातचे मुख्यमंत्री (२००१ –२०१४) :
-
२००१ : केशुभाई पटेल यांच्या जागी नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात आले.
-
२००२ : गुजरातमध्ये दंगल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली, पण त्यांनी राजकीयदृष्ट्या आपले स्थान मजबूत ठेवले.
-
२००२, २००७, २०१२ : सलग तीन वेळा भाजपला बहुमत मिळवून त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद टिकवले.
-
त्यांच्या काळात गुजरातमध्ये औद्योगिकीकरण, विकास आणि ‘गुजरात मॉडेल’ ची चर्चा वाढली.
नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ
- पहिला कार्यकाळ: २६ मे २०१४ ते ३० मे २०१९
मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळवून दिले. त्यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.- - दुसरा कार्यकाळ: ३० मे २०१९ ते ९ जून २०२४
२०१९ च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा बहुमत मिळवले आणि नरेंद्र मोदी यांनी ३० मे २०१९ रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.- - तिसरा कार्यकाळ: ९ जून २०२४ पासून सुरू (सद्यस्थितीत)
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकट्याला बहुमत मिळाले नाही, परंतु NDA ने ५४३ पैकी २९३ जागा जिंकून बहुमत मिळवले. या विजयामुळे नरेंद्र मोदी यांनी ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या वेळी त्यांना १४ प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती.