कर्णधार : शुभमन गिल उपकर्णधार : ऋषभ पंत
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असेल. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याला कसोटी क्रिकेट संघात तरुण नेतृत्व आणि नव्या दमाचे खेळाडू हवे होते. त्यामुळे गौतम गंभीर हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भारतीय संघात खेळवण्यासाठी उत्सुक नव्हता. विराट कोहलीला संघात स्थान मिळाले असते तरी त्याच्याकडे कर्णधारपद नसते. यामुळेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुभमन गिल, कर्णधार
ऋषभ पंत- उपकर्णधार
यशस्वी जयस्वाल
करुण नायर
रवींद्र जाडेजा
वॉशिंग्टन सुंदर
शार्दुल ठाकूर
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
आकाश दीप
कुलदीप यादव
के एल राहुल
साई सुदर्शन
अभिमन्यू ईश्वरन
ध्रुव जुरेल
प्रसिद्ध कृष्णा
अर्शदीप सिंग
नितीश कुमार रेड्डी
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तडाखेबंद फलंदाजी करणारा आणि ऑरेंज कॅपचा मानकरी साई सुंदरला कसोटी संघात स्थान मिळेल, अशी आशा होती. तो रोहित शर्माच्या जागी सलामीला येईल, अशी अटकळ बांधली जात होती. ही अटकळ खरी ठरली असून साई सुदर्शनचा भारतीय क्रिकेट संघात स्थान समावेश करण्यात आला आहे.
संघातील फलंदाज
बीसीसीआयने घोषणा केलेल्या कसोटी संघात शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ई्श्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर या फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.
संघातील गोलंदाज
भारतीय कसोटी संघात वेगवान गोलंदाजीची धुरा शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग हे सांभाळतील. तर फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या दोन फुलटाईम फिरकी गोलंदाजांचा समावेश असेल.
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा २० जूनपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
पहिली कसोटी: २०-२४ जून २०२५ – हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी: २-६ जुलै २०२५ – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: १०-१४ जुलै २०२५ – लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी: २३-२७ जुलै २०२५ – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: ३१ जुलै-४ ऑगस्ट २०२५ – द ओव्हल, लंडन