दिवंगत राष्ट्रपतींचा जीवनपट पडद्यावर येणार

0
146
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

भारताचे ११वे राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत करणार आहे. ओम यांनी ‘लोकमान्य : एक युगपुरुष’, ‘तान्हाजी’ आणि ‘आदिपुरुष’ यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटाचे नाव ‘कलाम’ असं ठरलं असून यात आंतरराष्ट्रीय स्टार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष हा कलाम यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची  घोषणा कान्स चित्रपट महोत्सव २०२५ च्या व्यासपीठावर  करण्यात आली.

रामेश्वरम ते राष्ट्रपती भवन प्रवास
चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि भूषण कुमार यांनी केली आहे. पटकथा सैविन क्वाड्स यांनी लिहिली आहे. डॉ. कलाम यांचा रामेश्वरम ते राष्ट्रपती भवन हा प्रवास प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या जवळचा आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाचा अवकाश शास्त्रज्ञ, दूरदर्शी नेते आणि नंतर राष्ट्रपती होण्याचा प्रवास सिनेमात दाखवला जाणार आहे. हा चित्रपट विज्ञान, सेवा आणि अध्यात्म यांचा संगम आहे. देश कसा बदलू शकतो, हे दाखवून देणाऱ्या व्यक्तीची कहाणी रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. ओम तीन-चार वर्षांच्या अंतरानं सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणतो, पण त्या प्रत्येक सिनेमाची चर्चा होते. आता नव्या बायोपिकमधून तो रुपेरी पडद्यावर काय जादू करणार हे पाहण्यासारखं असेल.

आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प
अब्दुल कलाम सर हे राजकारणाच्या पलीकडे असलेले नेते होते. शिक्षण, उत्कृष्टता आणि स्वदेशी नवोपक्रमाच्या शक्तीसाठी ओळखलं जाणारं हे व्यक्तिमत्त्व होतं. त्यांची कहाणी पडद्यावर आणणं हे एक कलात्मक आव्हान आणि सांस्कृतिक जबाबदारीसुद्धा आहे. ही एक अशी कहाणी आहे, जी जागतिक तरुणांसाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमधील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे, असं ओम राऊत म्हणतत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here