भुजबळ यांना मंत्री पद : ओबीसी जनमोर्चाच्या वतीने साखर वाटप..

0
181
OBC Janamorcha Kolhapur distributed sugar at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk to mark the election of OBC leader Chhagan Bhujbal as a cabinet minister.
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ओबीसी जनमोर्चा कोल्हापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिगंबर लोहारमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ओबीसी मंत्री आहेत. परंतु सारा गाव मामाचा पण एकबी नाही कामाचा अशी अवस्था होती. छगन भुजबळ सारखी मुलुख मैदानी तोफ मंत्रिमंडळात असणे आवश्यक होते. त्यांना त्यांची ज्येष्ठता पाहून या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात योग्य ते स्थान द्यायला हवे होते. पण आता महाराष्ट्र सरकारने त्यांची चूक सुधारून भुजबळ यांना मंत्रिपद दिलं आहे त्याबद्दल आम्ही आज साखर वाटून आनंद साजरा करत आहोत” अशी प्रतिक्रिया  यांनी यावेळी व्यक्त केली.

ओबीसी जनमोर्चा महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी डोंगरसाने- मंत्री छगन भुजबळ ओबीसी समाजाचा आत्मा आहेत. त्यांना सन्मानाने महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी घेतल्या मुळे ओबीसीं आनंदले आहेत.

यावेळी सर्वश्री अशोक माळी, अनिल खडके, अजय अकोळकर, युवा नेते सद्दाम मुजावर, विजय करजगार, मोहन पोवार, माळी सामाज अध्यक्ष व कणेरीमठचे सरपंच आनंदराव माळी, किशोर लिमकर, चंद्रकांत कोवळे,आनंद गुरव, गजानन भुर्के आदी भर पावसातही सहभागी झाले होते.

————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here