spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeकृषीचहा एक सुसंवादाचे माध्यम

चहा एक सुसंवादाचे माध्यम

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

सकाळच्या प्रहरी घरातील सर्वजण एकत्र येतो आणि गप्पा मारत मारत चहाचा एक एक घोट घेत असतो. आपला दिवसच चहाने सुरु होतो. ऑफिसमध्ये मिटींगची सुरुवात चहानेच होते. मित्रांशी गप्पा चहामुळेच रंगतात. अचानक स्नेही भेटला तर चहा पीत पितच ख्याली कुशाली समजते. म्हणूनच सध्या चहा एक सुसंवादाचे माध्यम झाले आहे. आज  [२१ मे] जागतिक चहा दिवस, यानिमित्त चहा पित पित हा लेख वाचूया!

खरं तर चहा सकाळी उठल्यावर तोंड धुऊन एकदा घ्यायचा आणि संध्याकाळी एकदा घ्यायचा इतकच मला माहित होत. मात्र पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना चहा सदासर्वकाळ घेतला तरी चालतो हे समजले. चहा प्यायल्यामुळे कंटाळा जातो. भूक तग धरते. उत्साह वाढतो. मात्र जास्त घेतला तर झोप लागत नाही, पित्त वाढते. तरीही परदेशातून पेय येवूनही केवळ विशिष्ट चवीमुळे हे पेय भारतात लोकप्रिय झाले आहे. भारतात चहा इतका पिला जातो कि, जगात चहा पिणाऱ्याची संख्या भारतीयांची सर्वात जास्त असेल. याचबरोबर  भारत हा जगातील सर्वात मोठ्या चहा उत्पादक देशांपैकी एक आहे.

चहाची सुरुवात चीनमध्ये झाली.  इसवी सनापूर्वी २७३७ मध्ये चहा चीनमध्ये लोक चहा पीत होते. भारतात चहा ब्रिटिश कालखंडात खूप प्रसिद्ध झाला. असं म्हंटले जाते,  भारतीयांना चहाची सवय ब्रिटीशांनी लावली.  

चहा हा एक गरम किंवा थंड पेय आहे जो चहाच्या झाडाच्या (Camellia sinensis) पानांपासून तयार केला जातो. त्यात पाणी, दूध, साखर आणि कधी-कधी मसाले घालून त्याचा स्वाद वाढवला जातो. पाणी, चहा पत्ती, दूध गरजेनुसार –  साखर , गूळ, गवती चहा, आलं, मसाले हे चहाचे घटक पदार्थ आहेत. 

 चहाचे प्रकार :

  • काळा चहा (Black Tea): सर्वसामान्यपणे मिळणारा, सर्वाधिक वापरात असलेला चहा.
  • हिरवा चहा (Green Tea): आरोग्यासाठी फायदेशीर, विशेषतः वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.
  • पांढरा चहा (White Tea): अत्यंत सौम्य चविला गोडसर.
  • उलॉग चहा (Oolong Tea): काळा हिरवा यांचे मिश्रण.
  • हर्बल चहा (Herbal Tea): औषधी वनस्पतींपासून तयार केलेला, यात चहा पानांचा वापर नसतो.
  • मसाला चहा (Masala Chai): आलं, वेलदोडा, दालचिनी, लवंग, मिरे इतर मसाल्यांसह बनवलेला.

 चहा पिण्याचे फायदे  :

  • मानसिक ताजेपणा मिळतो

  • पचनक्रिया सुधारते

  • अँटीऑक्सिडंट्स मिळतात

  • काही प्रकारांचे वजन कमी करण्यात सहाय्य

  • थकवा दूर होतो

चहा पिण्याचे तोटे :

  • जास्त प्रमाणात घेतल्यास झोपेवर परिणाम

  • ऍसिडिटी होण्याची शक्यता

  • कैफीनचे दुष्परिणाम

  • दात पिवळे पडणे

  • भारतामधील प्रमुख चहा उत्पादक राज्ये : आसाम, दार्जिलिंग (पश्चिम बंगाल), निलगिरी (तामिळनाडू),  सिक्कीम, केरळ


RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments