spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeशिक्षणदहावी नंतर शिक्षणाची वाट सुलभ : CSR कंपन्यांच्या शिष्यवृत्त्यांमुळे विद्यार्थ्यांना नवे बळ

दहावी नंतर शिक्षणाची वाट सुलभ : CSR कंपन्यांच्या शिष्यवृत्त्यांमुळे विद्यार्थ्यांना नवे बळ

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

गावाकडच्या गरीब शेतकऱ्याच्या लेकराला, कारागिराच्या घरात जन्मलेल्या मुलीला… शिक्षणासाठी मोठ्या शहरात जायचंय, पण आर्थिक अडचणीमुळे पाऊल पुढे पडायचं थांबतं. अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी आता कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून आणि काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शिष्यवृत्तींच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक कारणाने अडते. ही अडथळ्यांची शर्यत दूर करण्यासाठी खालील काही शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास हातभार लावत आहेत

शिष्यवृत्ती संधींची यादी :

* शिष्यवृत्ती क्रमांक १ : १० वी मध्ये ८५% पेक्षा जास्त गुण मिळाले असल्यास आणि तुम्ही मुंबई MMR रिजन मधील असल्यास कोटक एज्यूकेशन फाऊंडेशनच्या Kotak Junior Scholarship Program स्कॉलरशिपसाठी apply करा. यामध्ये तुम्हाला ₹७३५००/- इतकी रक्कम मिळेल.

* शिष्यवृत्ती क्रमांक २ : १० वी मध्ये किमान ५५% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Scholarship Programme ही स्कॉलरशिप भरा, ज्यात ₹१८०००/- इतकी रक्कम मिळू शकेल.

* शिष्यवृत्ती क्रमांक ३ : नोंदणीकृत बांधकाम कामगार ह्यांच्या पाल्याला ५०% पेक्षा जास्त गुण मिळाले असल्यास त्यांनी बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या १०/१२ वी मध्ये ५० % पेक्षा अधिक गुण स्कॉलरशिपचे अर्ज भरा. ज्यात ₹१००००/- इतकी रक्कम मिळेल.

* शिष्यवृत्ती क्रमांक ४ : – नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांने ११ वीसाठी प्रवेश घेतल्यानंतर बांधकाम कामगार मंडळ कडे ११/१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी ₹१००००/- च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा.

* शिष्यवृत्ती क्रमांक ५ : इतर सर्वांनी Buddy4study.com ह्यावर आपल्या eligibility नुसार apply करा.

* शिष्यवृत्ती क्रमांक ६ : रायगड जिल्ह्यातील ११ वीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीने सुदर्शन केमिकल CSR फाउंडेशनच्या सुधा स्कॉलरशिपसाठी apply करा.

* शिष्यवृत्ती क्रमांक ७ : रायगड जिल्ह्यातील निवडक तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्वदेस फाऊंडेशनच्या स्वदेस स्कॉलरशिपसाठी apply करा.

कोल्हापूरमधील शिष्यवृत्ती संस्था व फाउंडेशन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक सहायता मंडळ, कोल्हापूर
  • लाभार्थी : ओबीसी, एससी, एसटी, व ईडब्ल्यूएस गटातील विद्यार्थी

  • शिष्यवृत्ती : दहावी नंतर उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

  • संपर्क : जिल्हा समाजकल्याण कार्यालय, कोल्हापूर

  • वेबसाइट : https://mahadbt.maharashtra.gov.in

* शाहू शिक्षण संस्था, कोल्हापूर
  • उद्दिष्ट : गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांसाठी स्वयंभूत शिष्यवृत्ती योजना

  • कार्य : ग्रामीण भागातील विद्यार्थी, विशेषतः मुलींना शैक्षणिक मदत

  • संपर्क : शाहूपुरी, कोल्हापूर (स्थानीय कार्यालय)

* गंगामाई शिक्षण प्रसारक मंडळ
  • शिष्यवृत्ती : कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

  • विशेषता : गरजू व अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र योजना

  • स्थान : जयसिंगपूर, कोल्हापूर

* श्री महालक्ष्मी शिक्षण संस्था
  • लाभार्थी  : कोल्हापूर व आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी

  • शिष्यवृत्त : कन्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर रक्कम

  • कार्य : शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

* सारथी, पुणे – कोल्हापूर विभागीय केंद्र
  • लाभार्थी : मराठा समाजातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी

  • कार्य : शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अभ्यास साहित्य

  • संपर्क : विभागीय कार्यालय, कोल्हापूर

  • वेबसाइट  : www.sarthi-maharashtragov.in

* दयानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
  • उद्दिष् : संस्थेच्या शाळा/महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

  • स्थापना : कोल्हापूर जिल्ह्यात 30+ शैक्षणिक संस्था

  • संपर्क : इचलकरंजी व कोल्हापूर मुख्य कार्यालय

* रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन
  • शिष्यवृत्ती : 10वी व 12वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी

  • विशेष योजना : विद्यार्थ्यांना स्टेशनरी, फी, पुस्तके यासाठी मदत

  • वेबसाइट : www.rotary.org (स्थानिक क्लबशी संपर्क आवश्यक)

* कोल्हापूर एज्युकेशन सोसायटी (KES)
  • शिष्यवृत्ती योजना : शैक्षणिक फी सवलत, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके

  • केंद्र : कागल, गडहिंग्लज, राधानगरी इ. ठिकाणी उपक्रम

* जैन समाज शैक्षणिक सहायता समिती, कोल्हापूर
  • लाभार्थी : जैन समाजातील विद्यार्थी

  • सहाय्य : शिष्यवृत्ती, पुस्तक मदत, फी सवलत

  • संपर्क : लक्ष्मीपुरी, कोल्हापूर

या संस्थांपैकी काहींची शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असते. अर्ज करताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रक, शाळा/कॉलेजचा दाखला आणि बँक खाते तपशील आवश्यक असतो. स्थानिक स्तरावर सामाजिक कार्यकर्ते किंवा शिक्षकांची मदतही विद्यार्थ्यांनी घ्यावी.

पालकांसाठी विशेष सूचना –

  • अर्ज करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी : गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला (प्रासंगिक), बँक पासबुक, फोटो

  • काही योजना विशिष्ट कालावधीतच खुल्या असतात. त्यामुळे वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

  • अडचण आल्यास शाळा/महाविद्यालयातील शिक्षक, स्थानिक सामाजिक संस्था यांची मदत घ्यावी.

            शिक्षण थांबवू नका, संधी पकडा – कारण भवितव्याला वळण देणारी तीच दिशा ठरते.        

——————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments