कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
‘जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी’
हे ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील ना. धो. महानोर यांनी लिहिलेले गीत फारच लोकप्रिय आहे. या गीतातील दुसऱ्याओळीप्रमाणे ढोल वाजण्याच्या हंगामातच म्हणजे लग्न सराईतच जांभूळ बाहारात येतात. हे एक औषधी फळ आहे. जांभूळ उष्णकटिबंधीय फळ आहे. भारतात हे झाड सर्वत्र आढळते, विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभूळ पक्व होतात.
पौष्टिक घटक (१०० ग्र्याम जांभूळ फळामध्ये):
कॅलरी: ~६० केसीएल, फायबर्स: ~०.६ जी., व्हिटॅमिन सी.: १८ एमजी, कॅल्शियम: १५-२० एमजी, लोह: ~१-२एमजी, अँटीऑक्सिडंट्स: उच्च प्रमाणात
औषधी गुणधर्म : जांभूळ आणि त्याच्या बियांना आयुर्वेदात महत्त्व आहे. त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत:
मधुमेह वर उपयोगी – जांभळाच्या बियांपासून तयार केलेला पूड मधुमेह नियंत्रणात मदत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
पचन सुधारते – जांभळात टँनिन्स आणि फायबर्स असल्यामुळे अन्न पचवायला मदत होते. अपचन, अतिसारावर उपयोगी.
रक्तशुद्धी – शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत होते. त्वचेसाठी उपयुक्त.
तोंडाच्या आरोग्यासाठी – तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांचे रोग यावर फायदेशीर.
जंतनाशक गुणधर्म – बियांचे चूर्ण आंत्रजंतू नष्ट करण्यास उपयुक्त.
दक्षता : काही लोकांना जास्त प्रमाणात जांभूळ खाल्ल्यास अॅसिडिटी किंवा जुलाब होऊ शकतात. रिकाम्या पोटी खाणे टाळावे (तुरटपणा त्रासदायक ठरू शकतो).



